MARATHI

स्मार्टफोनच्या जगात मुकेश अंबानींचा धमाका! प्रीपेड प्लॅनपेक्षा स्वस्त फोन

JioBharat J1 4G : भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने दिवाळीपूर्वी ग्राहकांना दिवाळी धमाका दिलाय. स्मार्टफोनच्या जगात मुकेश अंबानी यांनी प्रीपेड प्लॅनपेक्षा स्वस्त फोन बाजारात आणला आहे. JioBharat J1 4G हा 2.8-इंच स्क्रीनसह HD कॉलिंग, JioMoney द्वारे UPI पेमेंट आणि Jio Cinema OTT असलेला फोन Amazon वर उपलबद्ध झालाय. Jio Bharat B2 आणि Jio Bharat K1 कार्बन 4G मॉडेल्सनंतर जिओचा हा सर्वात स्वस्त फोन आहे. Amazon वर Jio Bharat J1 4G ची किंमत 1,799 रुपयांमध्ये मिळणार आहे. हे नवीन मॉडेल Amazon वर उपलब्ध असून कंपनीच्या स्वतःच्या वेबसाइट्स, Reliance Digital आणि JioMart वर अद्याप ते सूचीबद्ध नाहीय. Amazon वर या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगितलंय की, या फोनची स्क्रीन 2.8 इंच आहे. पण हा फोन टच स्क्रीन नसणार आहे. यात 2500mAh बॅटरी असून जी तुम्ही काढू पण शकता. त्याशिवाय हेडफोन कनेक्ट करण्यासाठी 3.5mm जॅक देखील या फोनला देण्यात आलाय. फोनमध्ये 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा आणि एफएम रेडिओ ग्राहकांना आवडणार आहे. यामध्ये मायक्रो एसडी कार्ड टाकून तुम्ही 128 जीबी पर्यंत स्टोरेज अधिक वाढवू शकता. या फोनद्वारे तुम्ही JioMoney द्वारे UPI पेमेंट करू शकता आणि एचडी गुणवत्तेत कॉलही करु शकता. यात Jio Cinema ॲप देखील असणार आहे. ज्याद्वारे तुम्ही 455 हून अधिक टीव्ही चॅनेल पाहू शकता. पण हा फोन फक्त Jio च्या नेटवर्कवर काम करेल हे महत्त्वाच आहे. इतर सिम कार्ड त्यात काम करणार नाहीत. चांगली गोष्ट म्हणजे हा फोन 23 भारतीय भाषांना सपोर्ट करणारा असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक याचा वापर करु शकणार आहेत. हा फोन आधीपासून Jio च्या ॲप्सने संपूर्ण असणार आहे. तो 4G VoLTE ला सपोर्ट करतो, ज्यामुळे चांगला कॉल आवाज उपलब्ध होणार आहे. Jio या फोनसोबत 123 रुपये किंमतीचा रिचार्ज प्लान तुम्हाला मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल, 14 जीबी डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.