MARATHI

जागतिक मंदीची चाहूल? अमेरिका Shutdown च्या उबंरठ्यावर, कामगारांना सक्तीची रजा! ट्रम्प कनेक्शन उघड

USA Government Shutdown: अमेरिकेमध्ये शटडाऊन लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील राजकीय तज्ज्ञ तसेच सध्या उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या जेम्स डेव्हिड वेंस या दोघांनीही शट डाऊनची मागणी केली आहे. ट्रम्प आणि वेंस यांनी अमेरिकी काँग्रेसमधील रिपब्लिकन नेत्यांना स्टॉपगॅप फंडिंग बिल (आर्थिक विधेयक) स्वीकारु नये असं आवाहन केलं आहे. या विधेयकाच्या मंजुरीच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा चालवण्यासाठी आर्थिक तरतूद करणं अपेक्षित होतं. मात्र आता या विधेयकाला नव्याने सत्तेत येत असणाऱ्या ट्रम्प यांनी विरोध करत अमेरिकेतील नेत्यांनाही याचा विरोध करण्याचा आग्रह केल्याने आता मार्चपर्यंतचा सरकारी यंत्रणांचा कारभार कसा चालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी शटडाऊनमध्ये सरकारची दैनंदिन कारभारातील कामं चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या केंद्रीय संस्थांना दिला जाणारा आर्थिक रसद थांबवली जाते. जर काँग्रेसने म्हणजेच अमेरिकेतील संसदेने आज या आर्थिक विधेयकाला मंजुरी दिली नाही तर अनेक सरकारी सेवा बंद पडतील. यामुळे अमेरिकेतील दैनंदिन जीवन कोलमडून पडेल असं सांगितलं जात आहे. शटडाऊन लागू झाल्यानंतर हवाई क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि हवाई वाहतूक नियंत्रक कामावर असतील मात्र त्यांना या कालावधीमध्ये वेतन दिलं जाणार नाही. यामुळे विमान उड्डाणांना उशीर होणं, विमान उड्डाणे रद्द होणं यासारख्या गोष्टींची शक्यता आहे. तसेच सीमा शुल्क आणि सुरक्षेसंदर्भातील सेवांवरही परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासात मोठा फटका बसू शकतो. शटडाऊनच्या कालावधीमध्ये पासपोर्ट आणि व्हिजा सेवाही विलंबाने सुरु असतील. कारण या सेवा अत्यावश्यक सेवांमध्ये येत नाहीत. अमेरिकेतील पत्रव्यवहाराला म्हणजेच पोस्टला या शडाऊनचा फटका बसणार नाही. कारण या देशात पोस्ट हे अमेरिकेतील करदात्यांकडून मिळणाऱ्या पैशावर चालत नाही. त्यासाठी वेगळं आर्थिक नियोजन केलं जातं. अमेरिकेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पेंटागॉनमधील 50 टक्के कर्मचाऱ्यांना पगार देता येणार नसल्याने सक्तीच्या रजेवर पाठवावं लागेल. लष्करी जवान कामावर कायम ठेवले जातील. मात्र त्यांना या कालावधीतील वेतनाची शाश्वती नसणार. सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विषयक सेवाही सुरु असतील, मात्र त्यात विलंब अपेक्षित आहे. पेंटागॉनबरोबरच इतरही अनेक सरकारी संघटना आणि संस्थांमधील व्यक्तींना वेतन देण्यासाठी पैसेच नसल्याने सक्तीच्या रजेवर पाठवावं लागेल असं चित्र दिसत आहे. शटडाऊनचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. आर्थिक मानांकन संस्था असलेल्या गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार शटडाऊनमुळे अमेरिकीचा आर्थिक विकास 0.2 टक्क्यांनी मंदावणार आहे. अमेरिकेली फेडर रिझर्व्हने व्याजदर कपात केलेली असतानाही शेअर बाजारात उत्साह दिसत नसून पडझड कायम आहे. या साऱ्या परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार हे सहाजिक आहे. दरम्यान, दुसरीकडे न्यूझीलंडमध्ये आर्थिक मंदी आली आहे. 1991 नंतर न्यूझीलंडची अर्थव्यवस्था सर्वात वाईट काळातून जात आहे. देशाचा जीडीपी 1.0 ने घसरला आहे. देशातील अनेक सेवांवर या मंदीचा परिणाम झाला असून बरंच अर्थिक नुकसान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.