MARATHI

पाकिस्तानी खेळाडूवर भडकले अंपायर, म्हणाले 'प्रत्येक बॉलवर ओरडतो, कबुतर सारख्या उड्या मारतो'

Umpire Anil Chaudhary About Mohammad Rizwan : पाकिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद रिझवान याच्या विकेटकिपिंग आणि फलंदाजीची चर्चा मागील काही वर्षांपासून रंगली आहे. मोहम्मद रिझवानने बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये खेळताना पहिल्याच सामन्यात 171 धावांची कामगिरी केली होती. मात्र रिझवानच्या विकेटकिपिंग स्टाईलवरून भारतीय अंपायर अनिल चौधरी यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या बरंच चर्चेत आलं आहे. अंपायरनी एका मुलाखतीत रिझवानबाबत बोलताना असे काही शब्द काढले त्याच्यावरून पाकिस्तान क्रिकेटचे फॅन्स नाराज होऊ शकतात. भारताचे दिग्गज अंपायर अनिल चौधरी यांना एका चॅट शोमध्ये मोहम्मद रिझवानबाबत प्रश्न विचारला होता. ज्यावर अनिल यांनी दिलेल्या उत्तरामुळे वाद निर्माण झाला आहे. अनिल चौधरी यांना चॅट शोमध्ये त्यांनी मोहम्मद रिझवान विकेटकिपर असताना अंपायरिंग केली आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. मुलाखत घेणारा व्यक्ती म्हणाला रिझवान खूप वेळा अपील करतो. तेव्हा उत्तर देताना अंपायर अनिल म्हणाले, "त्याला अपील करत राहू देत फरक पडत नाही. मी इतर अंपायरला सुद्धा सांगितलंय की हा खूप वेळा जोरदार अपील करतो तुम्ही लक्षात ठेवा". Anil Chaudhary and Iffi Bhai could be twins—both in looks and their impeccable knack for stirring up debate on shaberaati! @Rizzvi73 @wwasay #WasayHabib #TwinsInDisguise #CricketTales " pic.twitter.com/CCrxLkFSTB — YOGESH OJHA (@YogeshOjha_) August 24, 2024 अनिल चौधरी पुढे म्हणाले की, "एकदा रिझवानने जोरदार अपील केली होती. तेव्हा मैदानातील एक अंपायर त्यांच्या अपील नुसार निर्णय देणार एवढ्यात त्याला अनिलने सांगितलेलं बोलण आठवलं आणि त्यांनी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला". अनिल म्हणाले, "तोच रिझवान ना जो ओठांवर लिपस्टिक सारखी गोष्ट लावतो, कबुतराप्रमाणे उद्या मारतो". हेही वाचा : गार्डनमध्ये कॅप्टन रोहितचा सराव, बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी हिटमॅनची जोरदार तयारी Video अनिल चौधरी यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात अनिल त्यांच्या रिझवानबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले असून पाकिस्तानी फॅन्स व्हिडीओ खाली वाईट कमेंट्स करत आपला राग व्यक्त करत आहेत.

CYP
67
(15.4 ov)
VS
CZE
48/6
(13.5 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.