MARATHI

एवढ्या पैशांचं आम्ही काय करु! IT कंपनीने जाहीर केलं वर्षाला 2.5 लाखांचं पॅकेज; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

Cognizant IT Company: आयटी क्षेत्रातील 30 वर्षं जुनी कंपनी कॉग्निझंट सध्या आपल्या ऑफ कॅम्पस प्लेसमेंटमुळे चर्चेत आहे. कंपनीने ऑफर केलेलं पॅकेज पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही कंपनी 1994 मध्ये चेन्नईत स्थापन करण्यात आली. कंपनीचे जगभरात 3.4 लाख कर्मचारी आहेत. ही कंपनी नियमितपणे Fortune 500 मध्ये स्थान मिळवते. मात्र भविष्याचा पाया रचणाऱ्या इंजिनिअर्सना कंपनी मूठभर पगार देत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने नव्याने नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षाला 2.5 लाखांचं पॅकेज ऑफर केलं आहे. विशेष म्हणजे 2002 मध्येही त्यांनी हेच पॅकेज ऑफर केलं होतं. सध्या कंपन्यांमध्ये सुरु असलेली कपात आणि एआयमुळे नोकरीवर आलेली गदा यामुळे तरुणही सध्या जी ऑफर मिळत आहे ती स्विकारत आहेत. मात्र कंपनीच्या या पॅकेजवरुन नेटकरी नाराज झाले असून टीका करत आहेत. 2.52 LPA offered by Cognizant. That's around 20k per month salary. Just for the reference, A maid who works for 30min in a house, works in 8-10 such houses get more salary than an Engineer. — EngiNerd. (@mainbhiengineer) August 13, 2024 सध्याची पिढी रिल्स करण्यात आणि युट्यूबर होण्यात जास्त रस दाखवत आहे याचं आश्चर्य वाटत नाही असं एकाने म्हटलं आहे. तर एकाने लोक यापेक्षा शिकवणी घेत जास्त कमावतात असा टोला लगावला आहे. People earn more than this giving tuition to high school kids in their hometown — Harsh Choudhary (@harshtwiits) August 13, 2024 People earn more than this giving tuition to high school kids in their hometown — Harsh Choudhary (@harshtwiits) August 13, 2024 एका युजरने 30 मिनिटं घरकाम करणाऱ्या महिला कशाप्रकारे 8 ते 10 घरांमध्ये काम करत यापेक्षा जास्त कमावतात हे सांगितलं आहे. या महिला इंजिनिअर्सपेक्षा जास्त पैसे कमावतात अशी खंत त्याने व्यक्त केली आहे. Freshers be like kya karunga mai itna dhanrashi ka Work load like 2050 Salary like stone age pic.twitter.com/PLDsYmlz8J — Arka Bhattacharjee (@niveyshak) August 13, 2024 तर एकाने रस्त्याशेजारी ठेला लगावणारे जास्त कमावतात असं म्हटलं आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.