MARATHI

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. 22 Jul 2024, 13:47 वाजता Nagpur Rain : नागपूरकरांना शनिवारी झालेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. महापालिका प्रशासनाचा निष्क्रिय कारभार, नालेसफाई आणि पावसाळ्याच्या तयारीचा अभाव यामुळे शहरात अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होतं... अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं. दरम्यान इथल्या नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत आणि सिमेंटच्या रस्त्यांची उंची वाढवल्याबाबत रोष व्यक्त केलाय. याबाबत आता लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आलीये... बातमीचा व्हिडीओ पाहा - 22 Jul 2024, 13:41 वाजता Sanjay Raut On Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक करा आणि ईडी चौकशी लावा अशी मागणी संजय राऊतांनी केलीय...विधान परिषद निवडणुकीत मविआचे 20 आमदार फोडले असे फडणवीस म्हणतात, त्यांनी आमदारांना किती पैसे दिले याची अमित शाहांनी चौकशी करावी असं राऊतांनी म्हटलंय...कालच फडणवीसांनी मविआचा फुगा फुटला असून, विधान परिषद निवडणुकीत त्यांचे 20 आमदार कधी फुटले ते कळलं नाही असं विधान केलं होतं...त्यावर राऊतांनी पलटवार केलाय... 22 Jul 2024, 12:41 वाजता Delhi Naresh Mhaske : महायुतीत पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढवल्या जातील आणि पुढील 15 वर्षे शिंदेच नेतृत्त्व करतील असा दावा खासदार नरेश म्हस्केंनी केलाय...मुख्यमंत्रीही शिंदेंच असतील असं मोठं विधान नरेश म्हस्केंनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.. बातमीचा व्हिडीओ पाहा - 22 Jul 2024, 12:23 वाजता Pimpri Hit And Run : पिंपरी-चिंचवडमध्ये हिट अँड रनच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीय. पिंपरी गावात कारनं पादचारी महिलेला धडक देऊन पसार झाल्याचं सीसीटीव्ही समोर आलंय.रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडलीय. कार चालकानं जाणीवपूर्वक महिलेला धडक दिल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. महिलेला धडक देऊन कार चालक फरार झालाय. अज्ञात कार चालकाला विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरूय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 22 Jul 2024, 12:12 वाजता Mulund Hit And Run : मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आलीय...ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिलीय...दोन रिक्षांना धडक देऊन ऑडी कार चालक फरार झालाय...यात रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झालेयत...रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे...अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय... बातमीचा व्हिडीओ पाहा 22 Jul 2024, 12:09 वाजता Manoj Jarange : ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही सांगा...असा सवाल मनोज जरांगेंनी फडणवीसांना विचारलाय...आरक्षण द्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू...आरक्षण नाही दिलं तर आम्हाला सरकार बनवावं लागेल असा इशाराही जरांगेंनी दिलाय...कालच फडणवीसांनी आरक्षणाबाबत मविआने भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलं होतं...त्यावर जरांगेंनी उत्तर दिलंय... बातमीचा व्हिडीओ पाहा - 22 Jul 2024, 11:49 वाजता Ajit Pawar Camp On Kavad Yatra : कावड यात्रेबाबत उत्तर प्रदेश सरकारनं काढलेल्या आदेशाला एनडीए आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं विरोध केलाय. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल आयोजित केलेल्या बैठकीमध्ये पक्षानं या आदेशाला विरोध केलाय. अजित पवार यांच्यासोबत चिराग पासवान आणि जयंत चौधरी या मित्र पक्षांनीही या आदेशाला विरोध केलाय. आज संसदेमध्ये या प्रश्नावरुन गोंधळ होण्याची शक्यताय. त्यामुळे विरोधकांसोबत मित्र पक्षाच्या विरोधामुळे संसदेत सरकारची कोंडी होण्याची शक्यताय. यात्रेच्या मार्गावर असणा-या हॉटेल आणि दुकानदारांनी त्यांची नावे ठळकपणे लिहावीत असा आदेश उत्तर प्रदेश सरकारनं काढलाय. यामुळे मुस्लिम आणि हिंदू धर्मातील काही जातीच्या हॉटेलमध्ये भाविक जाणार नाही अशी भिती व्यक्त केली जातेय. त्यामुळे या निर्णयाला विरोध होतोय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 22 Jul 2024, 11:25 वाजता Sanjay Raut On Devendra Fadanvis : फडणवीसांच्या ठोकून काढा या विधानावर राऊतांनी हल्लाबोल चढवलाय...ठोकून काढा म्हणजे काय...? गृहमंत्री गुंडांची भाषा वापरतायत....गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवा...आणि दम असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवून मैदानात या असं आव्हान राऊतांनी दिलंय...कालच फडणवीसांना कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना विरोधकांना उत्तर देताना आदेशाची वाट पाहू नका...मैदानात उतरून ठोकून काढा असा आदेश दिला...त्यावरून राऊतांनी समाचार घेतलाय... बातमीचा व्हिडीओ पाहा - 22 Jul 2024, 09:55 वाजता Bangladesh Protest Update : बांग्लादेशातील हिंसेचा भारतीय व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. बांग्लादेशात उसळलेल्या दंगलीमुळे संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. समुद्रीमार्ग आणि सर्व रस्ते बंद करण्यात आलेत. यामुळे भारतीय व्यापा-यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. दोन्ही बाजूने माल वाहतूक बंद करण्यात आली. माल वाहून नेणारे शेकडो ट्रक सीमेवर अडकून पडलेत. यामुळे व्यापार ठप्प झालाय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 22 Jul 2024, 09:48 वाजता Central Railway : सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय...यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झालीय...आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने सकाळीच कामावर जाणा-यांचे हाल झालेयत... बातमीचा व्हिडीओ पाहा - None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.