MARATHI

Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ!

Shortest Test Match: कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना 1998 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. हा समान फक्त 62 चेंडूंमध्ये पूर्ण झाला होता. भयानक खेळपट्टीमुळे हा कसोटी सामना रद्द करावा लागला होता. त्या सामन्याच्या वेळी फलंदाजांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या धोकादायक खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांना रक्तस्राव झाला. या कसोटी सामन्याचे यजमानपद वेस्ट इंडिज करत होते, त्यामुळे हा सामना सबिना पार्क स्टेडियमवर खेळवला जात होता. पाहुण्या संघ इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता, पण खेळपट्टी खूपच मारक बनली होती. इंग्लंडचे फलंदाज रक्तबंबाळ झाले होते. इंग्लंडकडून कर्णधार माईक अर्थ्टन आणि यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक स्टीवर्ट फलंदाजीला आले. वेस्ट इंडिज त्यावेळी धोकादायक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. वेस्ट इंडिजकडून कर्टली ॲम्ब्रोस आणि कोर्टनी वॉल्श गोलंदाजी करायला आले होते. या दोन गोलंदाजांनी गोलंदाजी सुरू केली तेव्हा इंग्लंडचे दोन्ही सलामीचे फलंदाज घाबरले होते. खरंतर, त्या दिवशी सबिना पार्क स्टेडियमच्या खेळपट्टीवर वेगळ्या प्रकारची उसळी आणि वेग वेगळ्या प्रकारचा होता. जास्त उसळीमुळे चेंडू थेट फलंदाजांच्या अंगावर आदळत होता. एक चेंडू प्रचंड वेगाने आला आणि थेट इंग्लंडच्या फलंदाजांच्या अंगावर आदळला. त्यामुळे सलामीच्या फलंदाजासह इतर खेळाडूही जखमी झाले. खेळपट्टी बरीच मारक बनली होती. इंग्लिश फलंदाजांचे रक्तस्त्राव झाले होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मैदानावरील पंच स्टीव्ह बकनर आणि श्रीनिवास वेंकटराघन यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र पंचांनी हा निर्णय घेतला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. इंग्लंडच्या फलंदाजांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. ते जबर जखमी झाले होते. खेळपट्टी इतकी खराब होती की पंचांना अवघ्या 62 चेंडूत हा निर्णय घ्यावा लागला, सामना केवळ 10.2 षटकांत संपला, ज्यामध्ये इंग्लंडने एकूण 3 विकेट गमावून 17 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.