MARATHI

ई-बाईकमुळे अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं; पैसा, दागिने, घर सगळं काही गमावलं

ब्रिटनमध्ये ई-स्कूटरने कुटुंबाच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेतलं आहे. इतकंच नाही तर कुटुंबाकडे कपड्य़ांशिवाय काहीच उरलं नसून, चक्क रस्त्यावर आलं आहे. ई-स्कूटरमुळे नेमकं असं काय झालं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. झालं असं की, ई-बाईकच्या बॅटरीत आग लागल्याने संपूर्ण घरं आगीत भस्मसात झालं. या घरात एकूण सात जणांचं कुटुंब वास्तव्यास होतं. त्याच्याकडे आता फक्त काही कपडे उरले आहेत असं वृत्त 'द मेट्रो'ने दिलं आहे. 9 जुलै रोजी 40 वर्षीय सायमन ब्लानशार्ड (Simon Blanshard) त्यांची जोडीदार 25 वर्षीय लॉरा नताले (Laura Natale) आणि त्यांची पाच मुले यांचं तीन बेडरूमचे घर आगीत नष्ट झालं. आग लागली तेव्हा घरात ई-बाईक चार्ज होत होती असं कुटुंबाने सांगितलं आहे. घर जळून खाक झाल्यानंतर कुटुंबाकडे आता राहण्यासाठी घरच नाही आहे. सध्या ते आपल्या मित्र आणि कुटुंबावर अवलंबून आहेत. त्यांनी त्यांना तात्पुरतं डोक्यावर छप्पर दिलं आहे. सायमन ब्लानशार्ड यांनी त्यांचं घर आणि सामानाचं नुकसान झाल्याने धक्का बसल्याचं म्हटलं आहे. "आम्ही सर्व काही गमावलं आहे," अशी खंत त्यांनी मांडली आहे. "आता आम्हााला शून्यापासून सुरुवात करावी लागत आहे," असं ते हतबलपणे म्हणाले आहेत. सायमन ब्लानशार्ड यांनी मेट्रोशी बोलताना सांगितलं आहे, "जवळपास आम्ही सर्व काही गमावलं असून नष्ट झालं आहे. जे काही जळालेलं नाही ते धुरात खराब झालं आहे. त्यामुळे घरात व्यवस्थित अशी एकही गोष्ट नाही. आम्ही या क्षणी माझ्या जोडीदाराच्या आईकडे राहत आहोत. आम्ही सध्या बेघर आहोत. ते विनाशकारी आहे; रडल्याशिवाय दिवस काढणे कठीण आहे". डॉनकास्टर, दक्षिण यॉर्कशायर येथे घडलेल्या या घटनेने ई-बाईकच्या बॅटरीचे धोके अधोरेखित केले असून वाढीव सुरक्षा उपायायोजनांची गरज असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी, उत्सर्जन डेटाचे विश्लेषण करणाऱ्या एमिशन ॲनालिटिक्स या फर्मने केलेल्या अभ्यासाने आव्हान दिले होते. वॉल स्ट्रीट जर्नल op-ed मध्ये वैशिष्ट्यीकृत अभ्यास, इलेक्ट्रिक आणि जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या दोन्ही कारमधील ब्रेक आणि टायर्समधून उद्भवणाऱ्या कण प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधलं होतं. मुख्य निष्कर्ष असा आहे की ईव्हीचं वजन जास्त असल्याने कार्यक्षम एक्झॉस्ट फिल्टरसह आधुनिक गॅस-चालित वाहनांच्या तुलनेत ब्रेक आणि टायर्समधून जास्त कण सोडू शकतात. अभ्यासानुसार हे 1,850 पट जास्त असू शकते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.