MARATHI

Kolkata Rape: 'मी निर्दोष, मला..', आरोपीने रडत सांगितलं 'लाय डिटेक्टर टेस्ट'साठी परवानगी देण्याचं कारण

Kolkata Rape Murder Case: कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी संजय रॉय दंडाधिकाऱ्यांसमोर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पॉलिग्राफी चाचणीसाठी म्हणजेच सामान्य भाषेत सांगायचं झालं तर लाय डिटेक्टर टेस्टसाठी सहमती दर्शवताना संजय रॉय रडू लागला. सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. मात्र तो कोर्टात नेमका का रडू लागला आणि नक्की कोर्टात काय झालं जाणून घेऊयात... केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेनं कोलकात्यामधील विशेष कोर्टात संजय रॉयला हजर केलं. या प्रकरणामधील मुख्य संशयित आरोपी असलेल्या संजय रॉयच्या पॉलीग्राफी चाचणीची परवानगी द्यावी असी मागणी सीबीआयने कोर्टाकडे केली. मात्र या सुनावणीदरम्यान आरोपीची संमती असल्याशिवाय परवानगी देता येत नसल्याने कोर्टाने संजय रॉयला परवानगी दिली तर चालेला का असं विचारलं असता होकार दिला. आरोपीचा होकार ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी तू पॉलिग्राफी चाचणीला होकार का देत आहे असा प्रश्न विचारला असता आरोपी भावनिक होऊन रडू लागला, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. आरोपी संजयने आपण काहीही केलेलं नसून आपल्याला अडकवलं जात असल्याचा आरोप केला. "मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला यात अडकवलं जात आहे. हेच कदाचित या चाचणीमधून सिद्ध होईल," असं आरोपी संजय म्हणाल्याचं या वृत्तपत्राने सांगितलं आहे. 23 ऑगस्ट रोजी संजय रॉयला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याच दिवशी त्याची पोलीस कोठडी संपत होती. नक्की वाचा >> Kolkata Rape Case: '150 ग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..' 9 ऑगस्टच्या सकाळी 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आर. की. कर कॉलेज आणि हॉस्पीटलमधील सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. यानंतर कोलकात्याबरोबरच देशभरामध्ये आंदोलन झालं. मृतदेह आढळून आल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 तारखेला संजय रॉयला कोलकाता पोलिसांनी अटक केली. संजय रॉय याच ठिकाणी पोलीस स्वयंसेवक म्हणून कार्यरत होता अशी माहिती तपासामध्ये समोर आली. 13 ऑगस्ट रोजी कोलकाता हायकोर्टाने या प्रकरणाची चौकशी कोलकाता पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले. घटनेच्या पाचव्या दिवशी सीबीआयने तपास हाती घेतला. नक्की वाचा >> Kolkata Rape Case: सुनावणीदरम्यान CJI चंद्रचूडच चुकले! चूक लक्षात आल्यावर म्हणाले, 'मी सतत...' सायको अॅनालिटीकल प्रोफायलिंगमध्ये रॉयने, "आपल्याला पॉर्नोग्राफीचं व्यसन आहे," असं मान्य केल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं होतं. तसेच या अधिकाऱ्याने रॉयला त्याने केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप होत असून त्याच्यामध्ये हिंसक प्राण्यासारखी वृत्ती दिसून आल्याचं सांगण्यात आलं.

WI
(20.0 ov) 179/6
VS
SA
149 (19.4 ov)
West Indies beat South Africa by 30 runs
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.