MARATHI

अवघ्या 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, धाराशीवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत

Dharashiv Crime: धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्कीच्या गुंडांची दादागिरी अद्यापही सुरूच आहे. विशेष म्हणजे वारंवार तक्रार करुनही पोलीस या गुंडांवर कारवाई करत नाहीत. त्यामुळे गुंडांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे.नुकत्याच घडलेल्या एका प्रकारात केवळ 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात पवनचक्कीच्या गुंडांविरोधात तक्रार देऊन 21 दिवस उलटले तरी पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल केला नाही. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावातील ठोंबरे कुटूंबीय गेली एक महिन्यापासून पवनचक्कीच्या गुंडाच्या दहशतीखाली वावरत आहे. मात्र त्यांना न्याय मिळत नाही.तुळजापूर तालुक्यातीलच मेसाई जवळगा गावात काळया रंगाच्या 18ते 20 स्कॉर्पिओ मधून आलेल्या 40 ते 50 पवनचक्कीच्या बाउन्सर गुंडांनी दहशत वाजवल्याचा प्रकारानंतर आणखी एक गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. जे एस डब्ल्यू या पवनचक्की कंपनीला तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावातील ठोंबरे कुटुंबीयांनी 20 गुंठे जमीन भाडेतत्त्वावर दिली आहे. मात्र या कंपनीकडून शेतकऱ्यांना दाबदडप करत ठोंबरे यांची 22 गुंठे जमीन न घेता 35 गुंठे जमीन बळकवण्यात आली. करारापेक्षा जास्त जमीन देण्यास विरोध केल्याने जे एस डब्ल्यू या कंपनीच्या ठेकेदाराने भाडोत्री गुंडाकडून जमिनीचा मालक सचिन ठोंबरे या शेतकऱ्याला गंभीर मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत शेतकरी सचिन ठोंबरे याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन त्याला रक्तबंबाळ करण्यात आले. इतका गंभरी प्रकार घडला तरी साधी तक्रारदेखील पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोपही शेतकरी सचिन ठोंबरे यांनी केलाय. शेतकरी सचिन ठोंबरे याला मारहाण केल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना सुद्धा पवनचक्कीच्या गुंडांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप शेतकरी सचिनच्या आई वडिलांनी केलाय.घडलेल्या प्रकाराची तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशनला न घेतल्यामुळे सचिन ठोंबरे यांनी थेट धाराशिवच्या जिल्हा पोलीस अध्यक्ष काकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे मात्र गेली 21 तारखेपासून आजपर्यंत या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. हा घडलेला प्रकार दाबण्यासाठी पवनचक्कीच्या गुप्तेदाराकडून शेतकरी सचिन ठोंबरे याला वीस गुंठ्यापेक्षा अधिक जमिनीचा मोबदला म्हणून 75 हजार रुपयाचा खात्यावर पैसै नसलेलेल्या बॅकेचा चेक देवून त्याची फसवणूक करण्यात आली असल्याचे सचिन ठोंबरे यानी सांगीतले आहे. बीड जिल्ह्याच्या मसाजोग येथील देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाच धाराशिवमधील बारुळ गावातील ठोंबरे कुटूंबीय पवनचक्कीच्या गुंडांच्या दहशतीखाली वावरत असल्याच समोर आलय. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामधील वनचक्कीच्या गुंडांची दहशत कधी संपणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलाय.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.