MARATHI

Gold, Silver Price : बजेट अगोदर सोन्याच्या दरात सुस्त, चांदीचे दर कोसळले, ताजा भाव पाहा

अर्थसंकल्पाच्या अगोदर कमोडिटी बाजार अतिशय सुस्ती पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात थोडी वाढ पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या सत्रात सोने 50 डॉलरने कमी होऊन 2400 डॉलर झाले होते तर चांदीत 3 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. देशांतर्गत बाजार सोन्याच्या दरात 1200 रुपये तर चांदीच्या दरात 2100 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच आजही सोन्या, चांदीच्या दरात बदल झालेले दिसत आहे. भारतीय फ्युचर्स मार्केट (MCX) वर, सोने 71 रुपयांच्या (0.1%) वाढीसह 73,061 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आताचा दर आहे. शुक्रवारी सोन्याचा दर हा 72990 या दरावर बंद झालं. तर आज सोने 73,184 रुपयांवर उघडले. आज चांदीच्या दरात मात्र बदल पाहायला मिळत आहे. 278 अंकांनी घसरून 89,368 रुपये प्रति किलोच्या आसपास दर आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 89,646 रुपयांवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 2 टक्क्यांहून अधिक घसरले आहे. या आठवड्यात सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. सप्टेंबरमध्ये व्याजदर कपातीच्या शक्यतांमुळे बाजार तेजीत राहिला, परंतु वरच्या स्तरावरून नफा बुकिंगमुळे यूएस स्पॉट गोल्ड 1.9% घसरून $2,399.27 प्रति औंस आणि यूएस सोन्याचे फ्युचर्स 2.3% घसरून $2,399.10 प्रति औंस झाले. ज्वेलर्स मालकांकडून कमी झालेल्या मागणीमुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोने 750 रुपयांनी घसरून 75,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. यासह, गेल्या सहा व्यापार सत्रांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेली वाढ संपुष्टात आली. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 76,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. दरम्यान, 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 800 रुपयांनी घसरून 75,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुरुवारी तो 76,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. चांदीचा भावही 1,000 रुपयांनी घसरून 93,000 रुपये प्रतिकिलो झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 94,000 रुपये प्रति किलो होता. सोन्याच्या दरात घट होण्याचे कारण म्हणजे जागतिक बाजारातील कमजोर कल आणि देशातील ज्वेलर्सकडून मागणी कमी होणे.

ENG
(88.3 ov) 416
(92.2 ov) 425
VS
WI
457 (111.5 ov)
143 (36.1 ov)
England beat West Indies by 241 runs
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.