MARATHI

रेल्वेत मेगाभरती! 32 हजार 438 जागांवर नोकरीची संधी; परीक्षा पॅटर्न, पात्रतेसंदर्भात सर्वकाही जाणून घ्या

RRB Group D Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे भरती बोडने पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे. रेल्वेकडून एक पत्रक जारी करण्यात आला असून वर्ग चारमधील विविध संवर्गातील 32 हजार ४३८ पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्वसासाठी २३ जानेवारीपासून ऑनलाईन सुविध देण्यात आलेली आहे. २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. ही कागदपत्रे उमेदवारांनी आत्ताच गोळा करुन ठेवावी, असं अवाहन प्रशासनाने केले आहे. उमेदवार भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइटवरही पाहू शकणार आहेत. जाहिरातीची तारीख- २८ डिसेंबर २०२४ अर्जाची तारीख- २३ जानेवारी २०२५ अर्ज दाखल करणे आणि फी भरणे- २२ फेब्रुवारी २०२५ हॉल तिकीट- परीक्षेच्या पूर्वी परीक्षेची तारीख यधावकाश जाहीर होणार आहे. ग्रुप-डी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना जनरल आणि ओबीसी उमेदवारांना 500 रुपये (सीबीटीमध्ये सहभागी झाल्यास 400 रुपये परत दिले जातील) आणि एससी/एसटी/ईबीसी/महिला/ट्रान्सजेंडर वर्गासाठी 250 रुपयांचे शुल्क आकारले जाईल. रेल्वे विभागात वर्ग चारमध्ये पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवार केवळ दहावी पास असण आवश्यक आहे. दहावी किंवा एनसीव्हीटीमधून एनएसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. 1 जुलै 2025 पर्यंत 18 ते 36 वर्षांच्या दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. ग्रुप डीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी सर्वसामान्य आणि ओबीसी उमेदवारांना ५०० रुपये आणि एससी, एसटी, ईबीसी, महिला, ट्रान्सजेंडर यांच्यासाठी २५० रुपये भरावे लागतील सामान्य विज्ञान: 25 प्रश्न गणित: 25 प्रश्न सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क: 30 प्रश्न सामान्य जागरूकता: 20 प्रश्न चुकीच्या उत्तरांसाठी 1/3 गुण वजा करून (बरोबर उत्तरांसाठी +1) गुण दिले जातील.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.