MARATHI

एका चुंबनाने 18 वर्षांच्या मुलीला घडवलं मृत्यूचं दर्शन; जीवघेण्या चुंबनाची भितीदायक कहाणी

Kiss Almost Took a Life: चुंबनाची किंमत एखाद्याला मृत्यूच्या अगदी जवळ घेऊन जाऊ शकते याची कुणी कल्पनाही केली नसेल. चुंबन किंवा किस ही प्रेमातील अतिशय प्रेमळ अशी भावना आहे. यातही पहिले चुंबन म्हणजे आयुष्याची आठवण जी माणसाला आयुष्यभर विसरायची नसते, पण या पहिल्या चुंबनाची किंमत मृत्यूपर्यंत पोहोचवेल याची कुणी कल्पनाही केली नसेल. पॅरिसमधील एका नाईट क्लबमध्ये 18 वर्षांची मुलगी एका मुलाकडे आकर्षित झाली आणि त्याने तिला मिठीत घेतलं नंतर प्रेमात मग्न असलेल्या मुलीने त्या मुलाचे चुंबन घेतले, परंतु चुंबन घेताच ती जवळजवळ मृत्यूच्या दाढेतून परत आली आहे. 10 वर्षांनंतर त्या मुलीने तिचा हा अनुभव सांगितला आहे. महत्त्वाचं म्हणजे ही मुलगी आता सिनेमाची निर्माती आहे. चित्रपट निर्माती फोबी कॅम्पबेल हॅरिस म्हणाली, “तेव्हा मी 18 वर्षांची होती. मी पॅरिसमधील नाईट क्लबमध्ये गेले होते. मी त्या मुलाचे चुंबन घेतले. चुंबनानंतर काही वेळातच माझा आवाज जड होऊ लागला. माझ्या मानेवर कोणीतरी सँडपेपरने घासल्यासारखे मोठ्या खुणा होते. यानंतर शरीराच्या अनेक भागात सूज येऊ लागली. माझ्याकडे असलेले इंजेक्शन मी घेतले. पण काही बदल दिसला नाही. तेवढ्यात कोणीतरी इमर्जन्सी कॉल केला. मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तोपर्यंत मी जवळजवळ मृत्यूच्या उंबरठ्यावर होतो. त्यावेळी मी जगेन अशी आशा नव्हती. माझा श्वास पूर्णपणे थांबला होता. निर्माती सांगते की, तो अनुभव आजही माझ्या मनाला छळतो. फोबीला ॲनाफिलेक्सिस नावाची ऍलर्जी आहे. जेव्हा ॲनाफिलेक्सिस होतो तेव्हा लोक खूप लवकर मृत्यूच्या जवळ पोहोचतात. हा आजार होताच, काही मिनिटांत ॲनाफिलेक्सिस शॉक येतो ज्यामध्ये शरीराच्या बहुतेक भागांना सूज येऊ लागते. श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, घसा व मांड्यांत खाज येणे, तीव्र चक्कर येणे, तीव्र खोकला व शरीरात जीव गमवावा लागतो. असे घडते जेव्हा एखाद्या विशिष्ट पदार्थाच्या संपर्कात आल्यावर, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकीच्या पद्धतीने शरीरात प्रक्रिया करते. ज्यामुळे ते विषासारखे कार्य करण्यास सुरवात करते आणि शरीर शॉकमध्ये जाते. ॲनाफिलेक्सिस ऍलर्जी काही गोष्टींमुळे होते. या मुलीला काजू म्हणजेच बदामाची ॲलर्जी होती. त्यात शेंगदाणे, बदाम इत्यादी असू शकतात. याशिवाय, काही गोष्टींमुळे ॲनाफिलेक्सिस ऍलर्जी देखील होऊ शकते. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची ऍलर्जी असू शकते. त्यात दूध, अंडी, मासे, गहू, सोयाबीन, शेंगदाणे, नट इत्यादी देखील असू शकतात.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.