MARATHI

BCCI कडून मोहम्मद शमीचे हेल्थ अपडेट जारी; चाहत्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी!

BCCI On Mohammad Shami Health Update: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये 5 सामने खेळवले जात आहेत. यातील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. त्यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे हेल्थ अपडेट जारी केले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमीच्या उजव्या टाचेच्या शस्त्रक्रियेनंतर शमी आता पूर्णपणे बरा झाला आहे. असे असले तरी सध्या त्याच्या डाव्या गुडघ्यात थोडी सूज आहे. त्यामुळे त्याच्या आगामाी मॅचमधील खेळावर परिणाम झाला आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये शमीने मध्य प्रदेशविरुद्ध खेळताना बंगाल टीमकडून 43 षटके टाकली होती. यानंतर त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) चे सर्व 9 सामने खेळले. यावेळी त्याने कसोटी सामन्यांच्या तयारीसाठी अतिरिक्त गोलंदाजी सत्रात भाग घेतला होता. News Medical & Fitness Update on Mohammed Shami #TeamIndia Read — BCCI (@BCCI) December 23, 2024 गोलंदाजीचा भार वाढल्यामुळे शमीच्या डाव्या गुडघ्याला थोडी सूज आली आहे. बराच वेळ गोलंदाजीपासून दूर राहिल्याने आणि नंतर अचानक कामाचा ताण वाढल्याने ही सूज आली आहे. ही सूज सामान्य असली तरी त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले आहे. शमीला अधिक वेळ हवा आहे. जेणेकरून तो नियंत्रित पद्धतीने गोलंदाजीचा दबाव हाताळू शकेल. याच कारणामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी शमीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही, असे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले आहे. शमी आता सेंटर ऑफ एक्सलन्समधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ताकद आणि कंडिशनिंग व्यायाम करेल. कसोटी क्रिकेटच्या मागणीनुसार गोलंदाजी करण्यासाठी त्याला याचा फायदा होईल. गुडघ्याच्या स्थितीत सुधारणा झाली तर तो विजय हजारे ट्रॉफीतील सहभागी होऊ शकेल, असे बीसीसीआयने सांगितले आहे. तसेच 'आम्ही मोहम्मद शमीच्या रिकव्हरी प्रक्रियेला प्राधान्य देत आहोत आणि त्याला पूर्णपणे तंदुरुस्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्याचे आरोग्य आणि फिटनेस भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.', असे बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने त्यांच्या नोटमध्ये म्हटले आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.