Cooking Tips: हिवाळा ऋतू खाण्यापिण्यासाठी सगळ्यात बेस्ट मनाला जातो. या सिजनमध्ये मटार भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध असतो. मटारपासून बनवलेल्या रेसिपीचा आस्वाद जवळपास सगळ्यांनाच घ्यायला आवडतो. मटार पुलाव आणि पराठे आवर्जून बनवले जातात. पण मटारची कोणतीही रेसिपी बनवण्याआधी ते सोलून घ्यावे लागतात जे लोकांना खूप अवघड काम वाटते. ते सोलायला इतका वेळ लागतो की अनेक वेळा लोकांची चिडचिड होते. अशा वेळी जर तुम्हालाही मटार सोलण्याचा त्रास होत असेल तर ते टाळण्यासाठी या सोप्या ट्रिक्सचा अवलंब करा आणि काही मिनिटांत सर्व मटार सोलून होतील. जर तुम्हाला मटार सोलण्यात तास घालवायचे नसतील, तर ही एक उत्तम पद्धत आहे. मटार लवकर सोलण्यासाठी, गरम पाण्यात 2-3 मिनिटे उकळवा. यानंतर मटार बर्फाच्या थंड पाण्यात टाका. यामुळे त्यांची साल मऊ होईल आणि त्यांचे दाणे सहज काढले जातील. हे ही वाचा: Indian filter coffee: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल फिल्टर कॉफी बनवा घरीच, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत जर तुमच्याकडे मटार सोलण्यासाठी वेळ नसेल, तर प्लास्टिकची पिशवी पुरेशी आहे. मटार एका पिशवीत ठेवा आणि हलके हलवा. घर्षणामुळे साले फुटतात आणि मटार सहज वेगळे होतात. हे ही वाचा: Chickpea Dosa Recipe: मसाला डोसा खाऊन कंटाळा आलाय? बनवा काबुली चण्याचा चविष्ट डोसा, जाणून घ्या रेसिपी मटार सोलण्यासाठी फ्रीजरची मदतही घेऊ शकता. मटार एक तास फ्रीजरमध्ये ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर जेव्हा तुम्ही मटार साल दाबाल तेव्हा त्यातील दाणे सहज बाहेर येतील. या उपायांनी तुम्ही मटार सोलण्याचा त्रास टाळू शकता. हे ही वाचा: Suji Mendu Vada Recipe: घरी बनवा झटपट मेदू वडा, रविवारचा नाश्ता होईल खास; जाणून रेसिपी आता चविष्ट मटारचे पदार्थ बनवण्यात कोणताही अडथळा येणार नाही. पुढच्या वेळी, या टिप्स वापरून पहा आणि मटारचा आनंद घ्या. (Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी 24 Taas जबाबदार नसेल.)
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.