Border Gavaskar Trophy : भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या टेस्टनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता बीसीसीआयने भारत - ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या उर्वरित सामन्यांसाठी अश्विनची रिप्लेसमेंट घोषित केली आहे. मुंबईच्या रणजी संघाचा खेळाडू तनुष कोटियन याला ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या टीम इंडियाकडून बोलवण्यात आले आहे, कोटियन बॉलिंग ऑलराउंडर असून ऑफ स्पिनर असण्यासोबतच तो उजव्या हाताचा फलंदाज देखील आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना हा 26 डिसेंबर पासून मेलबर्न येथे होणार आहे. मेलबर्न टेस्ट दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने तनुष कोटियन हा मंगळवार 23 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. आर अश्विनने निवृत्ती घेतल्यामुळे भारताच्या १८ खेळाडूंच्या संघात 26 वर्षांच्या तनुष कोटियन याला देखील सामील करण्यात आले होत. 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला आर अश्विन लगेचच दुसऱ्या दिवशी 19 डिसेंबरला भारतात परतला. मालिकेतील उरलेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याने ऑस्ट्रेलियात टीम इंडिया सोबत न राहण्याचा निर्णय घेतला. NEWS Border-Gavaskar Trophy: Tanush Kotian added to India Test squad. TeamIndia | AUSvIND More Details— BCCI (BCCI) December 23, 2024 तनुष कोटियन याने सोमवारी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात 50 ओव्हरचा सामना खेळाला. हैद्राबाद येथे झालेल्या सामन्यात 10 ओव्हरमध्ये 38 धावा देऊन तनुषने दोन फलंदाजांची विकेट घेतली. हा सामना मुंबई इंडियन्सने 3 विकेट्सने जिंकला. कोटियन 33 फर्स्ट क्लास सामन्यात 101 विकेट्स घेतल्या आहेत. तर तीनवेळा त्याने ५ विकेट्स घेणाऱ्याचा विक्रम केला आहे. तर कोटियनने 1525 धावा केल्या असून यात 2 शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. कोटियनने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 101, लिस्ट ए मध्ये 20 विकेट आणि टी-20 मध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने एकूण 154 विकेट्स घेतल्या आहेत. पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:


Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.