MARATHI

LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्य-देशभरातील आजच्या दिवसभरात नेमकं काय घडतंय हे थोडक्यात एका क्लिकवर जाणून घ्या. Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज पाचवा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या... 20 Dec 2024, 20:29 वाजता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने आज उत्तर प्रादेशिक ब्युरो प्रदेशात प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) या दहशतवादी संघटनेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांशी संबंधित खटल्याच्या संदर्भात पाच राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतला. पंजाबमधील पटियाला आणि श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यात 2 ठिकाणी, हरियाणातील मानेसर आणि गुडगाव जिल्ह्यात 4 ठिकाणी, नवी दिल्लीत 2 ठिकाणी आणि बिहारच्या पाटणा जिल्ह्यात आणि आझमगड जिल्ह्यात प्रत्येकी 1 ठिकाणी संशयितांच्या घरांची व्यापक झडती घेण्यात आली. 20 Dec 2024, 19:38 वाजता संतोष देशमुखांच्या हत्येचं कुणीही समर्थन करत नाही. 'दूध का दूध आणि पानी का पानी' होऊन जाईल. या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यासोबत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं धनंजय मुंडे म्हणाले. 20 Dec 2024, 19:09 वाजता परळीतील नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी चार जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिव्या देत धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 Dec 2024, 18:01 वाजता एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय वरिष्ठ अधिकाऱ्याला ठाकरे गटाचा दणका. मॅनेजर नितीश कुमार हा महेश पवार यांना मागील सहा महिन्यांपासून त्रास देत होता. एक बिहारी सब पे भारी अशी धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याची शिवसैनिकांनी कानउघडणी केली आहे. 20 Dec 2024, 17:17 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषदेत मोठा दावा केला आहे. मस्साजोग घटनेतील वाल्मिक कराड हे गेल्या 4 दिवसांपासून नागपूरातील फार्म हाऊसवर आहे. तरी देखील पोलीस त्याला पकडत नाहीत असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. 20 Dec 2024, 16:39 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. 20 Dec 2024, 16:13 वाजता परळी नगरपालिकेत घरकुल विभाग पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 Dec 2024, 16:01 वाजता कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी अखीलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पोलिसांना आत्मसमर्पण केल्याची माहिती. 20 Dec 2024, 15:30 वाजता नागपुरात युवक काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला आहे. नागपूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा, वाढत्या घरपट्टीमुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांचा मुद्दा, वाढलेले वीज बिल, दिव्यांग, तसेच बेरोजगार तरुणांचा प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे. 20 Dec 2024, 15:16 वाजता कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. फेसबुकवर पोस्ट करुन त्यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.