MARATHI

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. 24 Dec 2024, 10:26 वाजता Mahayuti : बंगले, दालनावरून महायुतीत नाराजी-सूत्र.. वास्तूप्रमाणे दालन मिळालं नसल्यानं मंत्री नाराज?... अनेक बंगले अशुभ असल्यची तक्रार-सूत्र...अनेक बंगले बदलण्याची शक्यता बातमीचा व्हिडीओ पाहा- 24 Dec 2024, 10:07 वाजता Ulhasnagar Hit and run : उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना...मद्यधुंद कारचालकाने 2 ते 3 वाहनांना उडवलं.. कारच्या धडकेत 9 जण जखमी.. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 मध्ये पहाटे 5 वाजताच्या सुमारास अपघात...कारची 2 दुचाकी आणि एक रिक्षाला धडक... जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू 24 Dec 2024, 09:36 वाजता Rain Alert : राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला पावसाची शक्यता..पुणे वेधशाळेचा वर्तवला पावसाचा अंदाज...उ. महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता...मुंबईतल्या वातावरणातही होणार बदल 24 Dec 2024, 09:13 वाजता Marathwada : मराठवाड्यात ओला दुष्काळ असल्याची माहिती समोर येतीये.. यावर्षी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं... या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय.. मराठवाड्यातील 8 हजार 486 गावांपैकी 6 हजार 150 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांहून कमी आलीये.. तर 2 हजार 336 गावांची पैसेवारी 50पैशांपेक्षा अधिक असल्याचं समोर आलंय. यात परभणी,नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश आहे.. अतिवृष्टीनंतर पंचनामे करुन शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर केलाय.. त्यानंतर शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी नुकसानीपोटी 2 हजार 726 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय.. अंतिम पैसेवारी 50 पैशांहून कमी असलेल्या गावांमधील शेतक-यांचा शेतसारा तसंच विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे.. तसंच वीज बीलातही 33 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. 24 Dec 2024, 08:34 वाजता Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगचां धुमाकूळ सुरुच आहे.. पुण्यातील लोहगावमध्ये साठी वस्तीत दोन तरुणांनी अनेक वाहनं आणि दुकानांची तोडफोड केलीये... कोयते दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलाय. या दोघांची दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीत.. या टोळक्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालीये. दरम्यान पोलीस या दोन्ही तरुणांचा शोध घेत आहेत.. 24 Dec 2024, 08:11 वाजता Railway Recruitment : रेल्वे भरती बोर्डाची पुन्हा एकदा मोठी भरती..32 हजार 438 जागांसाठी ही भरती असणारेय...23 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार...22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार 24 Dec 2024, 07:55 वाजता Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील दोन दिवसीय परभणी जिल्हा दौऱ्यावर जाऊन गाठी भेटी घेणार आहेत. दोन दिवसीय परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज ते पाथरी, पोखर्णी, शिंगणापूर फाटा मार्गे दामपुरी इथे मुक्कामी असणारेत. तर उद्या दामपुरी वरून पूर्णा तालुक्यातील आलेगाव इथे येणार आहेत, त्यानंतर परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेणार आहेत, त्यानंतर मनोज जरांगे पाटील साळेगाव वरून बीड जिल्ह्यतील मस्साजोग इथे जाणार. पुढे नागझरी वरून अंतरवालीत येणार बातमीचा व्हिडीओ पाहा- 24 Dec 2024, 07:53 वाजता The bar will be open all night on the 31st : नाताळसह नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आज उद्या आणि 31 डिसेंबरला हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स रात्रभर सुरु राहणार आहेत.. पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्यास गृहविभागानं परवानगी दिलीये.. या तीन दिवशी वाईनशॉप मध्यरात्री 1वाजेपर्यंत सुरु असतील तर परमीट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बीअरबार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.. खुल्या जागेत होणा-या संगीत कार्यक्रमांसाठीही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीये. बातमीचा व्हिडीओ पाहा- None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.