MARATHI

मोठ्या संकटाची चाहूल? Pyramids ची पडझड, स्थानिक म्हणाले, 'आमचे देव गायब...'

Ancient Pyramids Collapse: उत्तर अमेरिकेमधील मॅक्सिको देशातील दोन पिरॅमिड्सची पडझड झाली आहे. मात्र या पिरॅमिड्सची पडझड होणं हे मानवजातीसाठी धोकादायक असल्याचं या पिरॅमिड्सचा हौतात्म्यासाठी वापर करणाऱ्या प्राचीन आदिवासी जमातीने म्हटलं आहे. हे पिरॅमिड्स तुटणे म्हणजे लवकरच पृथ्वीवर अभूतपूर्व नैसर्गिक संकट येणार असल्याचे संकेत असल्याचं या आदिवासी जमातीचं म्हणणं आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, एका वादळामध्ये या छोट्या आकाराच्या पिरॅमिड्सची पडझड झाल्यानंतर याहूनही फार मोठं संकट येणार असल्याची ही चाहूल आहे अशी भिती या जमातीला वाटत आहे. मॅक्सिकोमध्ये हे पिरॅमिड्स ज्या भागात आहेत तिथे 30 जुलै रोजी मोठ्याप्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे या पिरॅमिड्सची एका बाजूची भिंत खचली. येथील पुरेपेचा जमातीच्या पूर्वजांनी हे पिरॅमिड्स उभारले होते. यापैकीच काही पिरॅमिड्सची पडझड झाली आहे. इतिहास अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरेपेचा जमातीकडून या पिरॅमिड्सचा वापर बळी देण्यासाठी होतो. या पिरॅमिड्सला हे लोक याकाटा पिरॅमिड्स असं म्हणतात. या जमातीचा सर्वात महत्त्वाच्या देवाचं नाव कुरीक्वीरी असं आहे. हे याकाटा पिरॅमिड्स मिचोआकन राज्यातील इहुआत्झिओ येथे आहेत. ही एक महत्त्वाची पुरातत्व साईट आहे. पुरेपेचा जमातीमधील तारियाकुईरी अल्वारेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे पिरॅमिड्स तुटणे हे जगावर संकट येण्याचे संकेत आहेत, असं आमची जमाती मानते. "आमच्या पूर्वजांनी बांधलेली वास्तू पडणं हा अपशकून आहे. याचा अर्थ लवकरच काहीतरी मोठं घडमार आहे. आमचे देव अचानक गायब होण्यापूर्वीही असेच काहीसे घडले होते," असं अल्वारेझ यांनी सांगितलं. पुरेपेचा जमातीने अझ्टेक जमातीचा पराभव केला होता. त्यांनी त्यानंतर या भूभागावर 400 वर्ष राज्य केलं होतं. त्यानंतर 1519 मध्ये स्पॅनिश लोकांनी या भूभागावर ताबा मिळवला. इहुआत्जियो येथील पुरातन वास्तूंचे अवशेष आढून आलेल्या साईटचा इतिहास इसवी सन 900 पासून सापडतो. अझ्टेक जमातीने सुरुवातीला येथे राज्य केलं त्यानंतर पुरेपेचा जमातीच्या लोकांचं राज्य होतं. सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार, पुरेपेचा तलाव क्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे ही पडझड झाली असं म्हटलं आहे. या ठिकाणी सामान्य पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला. या ठिकाणी पूर्वी फार अधिक तापमान असल्याने दगडांना आधीच भेगा पडल्या होत्या. त्यामुळेच पाणी या पिरॅमिड्समध्ये गेलं आणि त्यांची पडझड झाली.

WI
(91.5 ov) 233
(56.2 ov) 201/5
VS
SA
357 (117.4 ov)
173/3 dec (29.0 ov)
West Indies drew with South Africa
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.