Salon Treatment for Hairs: आजच्या फॅशनच्या काळात प्रत्येकजण आपल्या लूककडे विशेष लक्ष देत असतो. आकर्षक आणि सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात बरेचजण कृत्रिम पद्धतींचा वापर करतात. अशातच विशेषत: महिला वर्ग आपल्या केसांची खास काळजी घेतात. केसांसाठी घेतली जाणारी सलुन ट्रीटमेंट ही सध्याच्या काळात महिला आणि पुरुषांमध्ये अत्यंत प्रचलित झाली आहे. स्ट्रेटनिंग, कर्लिंग, हेअर डाय आणि केसांसाठी असलेल्या इतर ट्रीटमेंट्स आता अगदीच सामान्य बाब ठरली आहे. लोक आकर्षक आणि रेशमी केसांसाठी पार्लरच्या विविध सुविधांचा लाभ घेतात. परंतु, या केसांच्या ट्रीटमेंट्सविषयी एक वेगळीच आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, हे सलुन ट्रीटमेंट्स आरोग्यासाठी घातक ठरु शकतात ज्यामुळे कँसरसारख्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, हेअर स्ट्रेटनिंग आणि केसांना डाय करण्यासाठी अशा केमिकल्सचा वापर केला जातो जे शरीरासाठी घातक असतात. हे केमिकल्स शरीरात कालांतराने जमा होऊन कँसरसारख्या आजाराला कारणीभूत ठरतात. केसांना डाय केल्याने केसांना चमक तर मिळतेच पण यात असलेल्या केमिकल्स मुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. हेअर डायमधील अमोनिया आणि पॅराफिन सारखे घातक केमिकल्स त्वचेमार्फत शरीरात प्रवेश करतात. यामुळे शरीरातील पेशींना धोका पोहोचतो आणि कँसरला कारणीभूत ठरतो. हेअर डायमुळे गळ्याच्या आणि डोक्याच्या कँसरचा धोका जास्त असतो. तसेच हेअर स्ट्रेंटनिंग करताना वापरात आलेले फॉर्मल्डिहाइड सारखे केमिकल्स सुद्धा शरीरासाठी घातक ठरतात. फॉर्मल्डिहाइड या केमिकलचा वापर केसांना स्मूद आणि स्ट्रेट बनवण्यासाठी केला जातो. परंतु, हे कँसरजन्य केमिकल असल्याचं खूप कमी जणांना माहित आहे. या केमिकल मुळे डोक्याच्या स्कॅल्पवरील एपिडर्मल पेशींवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि यामुळेच कँसरचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त या केमिकल्सच्या संपर्कात आल्याने श्वसनविकार तसेच त्वचेला जळजळ होण्याच्या समस्या सुद्धा होऊ शकतात. हे ही वाचा: झोपेचे 'हे' वेळापत्रक फॉलो करा, राहाल आरोग्यदायी या आजारांचा धोका टाळण्यासाठी केसांच्या ट्रीटमेंट्ससाठी वापरले जाणारे प्रोडक्ट्स केमिकल्स फ्री असतील याची खात्री करुन घ्या. हेअर ट्रीटमेंट्सच्या सेवांचा लाभ घेण्याआधी नैसर्गिक आणि ताजे प्रोडक्ट्स वापर करणे तसेच वारंवार हेअर ट्रीटमेंट्स टाळणे हा स्वास्थ्यासंबंधी आजारांना दूर ठेवण्यासाठी चांगला उपाय ठरु शकतो. (Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी 24 Taas जबाबदार नसेल.)
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.