MARATHI

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. 20 Dec 2024, 19:24 वाजता Nana Patole Letter to Fadanvis : अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, काँग्रेस नेते नाना पटोलेंची फडणवीसांकडे मागणी.. भारत जोडो यात्रेत नक्षली संघटना असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. 20 Dec 2024, 18:21 वाजता Ambadas Danve on Karad : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा परिषदेत मोठा दावा.. मस्साजोग घटनेतील वाल्मिक कराड हे नागपुरातील फार्म हाऊसवर असल्याचा दावा.. कराड मागील 4 दिवसांपासून नागपुरात आहे. मी त्यांचा पत्ता देऊ शकतो. पण पोलीस त्याला पकडत नाहीत असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 20 Dec 2024, 17:01 वाजता Aditya Thackeray on CM Fadanvis : बीड, परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव आहे, असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायेत? असा सवाल करत फडणवीस विधानसभेत स्पष्ट बोलले नाहीत, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केलाय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 20 Dec 2024, 14:44 वाजता Kalyan Update : कल्याणमधील मराठी कुटुंबावर हल्ला करण्यासाठी शुक्लानं बाहेरुन गुंड आणल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.. या गुंडांची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालीत.. या गुंडांनी मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली.. 20 Dec 2024, 14:15 वाजता Nagpur Jitendra Awhad : धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय.. बीड आणि परभणी प्रकरणी न्याय मिणार नाही असा आरोप करत त्यांनी सभात्याग केलाय. 20 Dec 2024, 14:14 वाजता Beed Dhanajay Deshmukh : सर्व आरोपींना अटक कऱण्याची मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलीय. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.. फडणवीस यांनी केलेल्या घोषणांवर विश्वास असल्याचंही धनंजय देशमुख म्हणालेत. 20 Dec 2024, 13:29 वाजता Nagpur Winter Session : कल्याणच्या मारहाणीचे विधानसभेतही पडसाद उमटले.. मराठी माणसांवर अन्याय सहन करणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिल प्रभू यांनी दिला..तर या घटनेतील आरोपी कोणीही असला तरी त्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पावारंनी दिलं... 20 Dec 2024, 13:21 वाजता Nagpur Suresh Dhas : बीड सरपंच हत्याप्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर भाजप नेते सुरेश धस यांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच जोवर पूर्ण चौकशी होत नाही तोवर शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 20 Dec 2024, 12:36 वाजता Nagpur Devendra Fadanvis : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन आणि SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा फडणवीसांनी केलीय. तसेच चौकशी 3-6 महिन्यात चौकशी पूर्ण करणार असल्याचंही फडणवीस म्हणालते.. तसेच आरोपींवर मोक्का लावणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.. 20 Dec 2024, 12:06 वाजता Kalyan Marhan Update : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर झालेल्या मारहाणीचे राजकीय पडसादही उमटलेत.. या मारहाणीवरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीये.. बातमीचा व्हिडीओ पाहा - None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.