Oscar 2025: ऑस्कर 2025 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. ऑस्कर 2025 सोहळा पुढील वर्षी थाटामाटात संपन्न होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत इथल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या 'अनुजा' या भारतीय लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. 'लाइव्ह-अॅक्शन' शॉर्ट फिल्ममध्ये 'अनुजा' 180 शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे. 'अनुजा'ची निर्मिती सुचित्रा मटाई यांची असून गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. 'अनुजा' हा लघुपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे. 'अनुजा' लघुपटाची कथा आणि कलाकार एडम.जे.ग्रेव्स लिखित, दिग्दर्शित या लघुपटामध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले तसेच सजदा पठाण, अनन्या शानभाग, गुलशन वालिया, सुशील परवाना, सुनीता भादुरीया, जुगल किशोर, पंकज गुप्ता, रोडॉल्फो राजीव हुर्बेट सारख्या कलाकारांनी या लघुपटामध्ये अभिनय केला आहे. 'अनुजा' लघुपटाची कथा एका भारतीय मुलीवर आधारित असून इंडो-अमेरिकन प्रोडक्शन अंतर्गत त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ऑस्करच्या लघुपट श्रेणीत 'अनुजा' लघुपटाला स्थान मिळाल्याबद्दल अभिनेते नागेश भोसले यांनी आनंद व्यक्त केला आहे. ऑस्कर सारख्या मानाच्या सोहळ्यात आपला लघुपट असणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बालमजुरी सारखा सामाजिक प्रश्न या लघुपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडला असून एका उत्तम टीमचा भाग होता आल्याचा आनंद होत असल्याचे नागेश भोसले यांनी सांगितले. 97 व्या ऑस्कर पुरस्कार-2025 च्या पुरस्कारासाठीची नामांकने 17 जानेवारीला जाहीर होणार आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळा हा 2 मार्च रोजी पार पडणार आहे. यामध्ये सोहळ्यामध्ये विजेते घोषित केले जाणार आहेत. त्यात 'वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करणारा 'अनुजा' लघुपट बाजी मारतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने बुधवारी आमिर खान निर्मित 'लापता लेडीज' हा चित्रपट 97 व्या ऑस्कर पुरस्कारच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर आता 'अनुजा'या लघुपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:
आधी खातेवाटपावरुन आता बंगलेवाटपावरुन मंत्री नाराज? कारणं वाचून डोक्याला मारुन घ्याल हात
December 24, 2024Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे
- By Sarkai Info
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, आता 'अनुजा' कडून अपेक्षा
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
अवघ्या 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, धाराशीवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.