Star Cricketer Announced His Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका अलीकडेच संपली. पाच सामन्यांच्या या रंजक बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताला हरवून तब्ब्ल 10 वर्षात प्रथमच ट्रॉफीवर आपले नाव नोंदवले आहे. दरम्यान आता बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका धाकड भारतीय क्रिकेटपटूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू ऋषी धवनने अचानक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऋषी धवनने भारतासाठी एक T20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत. वेगवान गोलंदाज अष्टपैलू ऋषी धवन हिमाचल प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. 34 वर्षीय ऋषी धवनने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजच्या समाप्तीनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. ऋषी धवनने अचानक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे त्यामुळे तो किमान प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत राहील. हे ही वाचा: Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ! ऋषी धवनने आपल्या भावनिक पोस्टमध्ये लिहिले की, 'जड अंत:करणाने मला भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करायची आहे. मला याचा कोणताही पश्चात्ताप नाही. या खेळाने मला अपार आनंद आणि असंख्य आठवणी दिल्या आहेत ज्या नेहमी माझ्या हृदयाच्या खूप जवळ राहतील.' Happy Retirement Rishi Dhawan! pic.twitter.com/EQZD6gYCWO — Daddyscore (@daddyscore) January 5, 2025 आपल्या प्रवासाबद्दल बोलताना धवनने आपल्या कारकिर्दीत योगदान देणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले. तो म्हणाला, " छोट्या सुरुवातीपासून ते मोठ्या टप्प्यांवर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे, हा माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. क्रिकेट ही माझी आवड आहे आणि दररोज सकाळी उठण्याचे माझे कारण आहे. मी माझे सर्व प्रशिक्षक, मार्गदर्शक, सहकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी माझ्या कारकिर्दीत मोलाचे योगदान दिले आहे." हे ही वाचा: ' माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला! ऋषी धवन रणजी ट्रॉफी हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणार आहे. ऋषी धवनने भारतासाठी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात जानेवारी २०१६ मध्ये केली. परंतु, 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि एक T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्याची कारकीर्द संपुष्टात आली. ऋषी धवनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जून २०१६ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळला होता. हिमाचल प्रदेश सध्या रणजी ट्रॉफीच्या ब गटात दुसऱ्या स्थानावर असून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहे. हे ही वाचा: 'या' सुंदरीच्या समोर अनन्या-सुहानाही फेल, वयाच्या 49 व्या वर्षीही 'ती' दिसते अप्रतिम; सौंदर्य टिकवण्यासाठी दुधाने करते अंघोळ? ऋषी धवनने IPL मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (2014-2024), मुंबई इंडियन्स (2013) आणि कोलकाता नाइट रायडर्स (2017) चे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये ऋषी धवनने 39 सामन्यात 25 विकेट घेतल्या आणि 210 धावा केल्या.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:


Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.