MARATHI

Vinod Kambli च्या Medical Report मधून धक्कादायक खुलासा! मेंदूमध्ये...; रुग्णालयाचा मोठा निर्णय

Vinod Kambli Health Update: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा मेडिकल चाचण्यांचा अहवाल समोर आला आहे. सोमवारी विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवडाभरात विनोद कांबळीची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्याला उपचारांसाठी सोमवारी रुग्णालयात दाखल करावं लागलं. विनोद कांबळीच्या मुत्राशयाला संसर्ग झाला असून स्नायू दुखत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र आता मेडिकल रिपोर्टमधून अधिक धक्कादायक खुलासा झाला असून विनोद कांबळीला नेमकं काय झालंय हे समोर आलं आहे. सोमवारी ठाण्यातील पालघरमधील अकृती रुग्णालयात विनोद कांबळीचा दाखल करण्यात आलं. डॉक्टर विवेक त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखाली विनोद कांबळीवर उपचार सुरु आहेत. डॉ. त्रिवेदींच्या नेतृत्वाखालील टीमनेच विनोद कांबळीच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या चाचण्या पार पडल्या. या चाचण्यांमध्ये विनोद कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. डॉक्टरांची टीम विनोद कांबळीच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. मंगळवारीही विनोद कांबळीच्या काही वैद्यकीय चाचण्या होणार आहेत. इतकेच नाही तर डॉक्टर त्रिवेदी यांनी रुग्णालयाचे प्रमुख एस. सिंह यांनी आयुष्यभरासाठी कांबळीला मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. 52 वर्षीय विनोद कांबळीला त्याच्या एका चाहत्यानेच सोमवारी रुग्णालयात दाखल केलं. विनोद कांबळीला रुग्णालयात दाखल करणारा चाहता स्वत: एक डॉक्टर असून त्याचे भिवंडीमधील काल्हेरमध्ये रुग्णालयात आहे. विनोद कांबळीला मागील काही वर्षांपासून प्रकृतीसंदर्भात अनेक समस्या आहेत. 2013 मध्ये विनोद कांबळीच्या हृदयावर दोनदा शस्रक्रीया झाल्या. यासाठी त्याचा मित्र सचिन तेंडुलकरने त्याला आर्थिक मदत केली होती. डिसेंबरच्या सुरुवातीला विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर दादारमधील शिवाजी पार्कवर दोघांचेही दिवंगत गुरु रमाकांत आचरेकर सरांच्या स्मृतीप्रत्यार्थ उभारण्यात आलेल्या स्माकरकाच्या अनावरण सोहळ्याला एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. विनोद कांबळीला या वेळी नीट बोलताही येत नव्हतं. विनोद कांबळीच्या प्रकृतीसंदर्भात अनेक माजी क्रिकेटपटुंनीही चिंता व्यक्त केली. अनेकांनी विनोद कांबळीसाठी मदतीचा हातही पुढे केल्याचं पहायला मिळालं. सध्या विनोद कांबळी रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.