MARATHI

OYO New Rule : आता अविवाहित जोडप्याला No Entry! कंपनीच्या चेकःइन पॉलिसीमध्ये मोठे बदल

OYO Rooms New Rule : सुट्ट्यांना जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण OYO ने आपल्या चेक-इन रुमच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ओयोच्या नव्या नियमानुसार अविवाहीत जोडप्यांना चेक इन करण्यास परवानगी नाही. Oyo ने भागीदार हॉटेल्ससाठी नवीन चेक-इन पॉलिसी सुरू केली आहे. नवीन धोरणानुसार, आता अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलच्या रूममध्ये चेक-इन करण्याची परवानगी मिळणार नाही. कंपनीने त्याची सुरुवात मेरठपासून केली आहे. Oyo ने भागीदार हॉटेल्ससाठी नवीन 'चेक-इन' धोरण लागू केले आहे, ज्याची सुरुवात मेरठपासून झाली आहे. नवीन धोरणानुसार अविवाहित जोडप्यांना यापुढे ‘चेक-इन’ करण्याची परवानगी मिळणार नाही. म्हणजे हॉटेलमध्ये फक्त पती-पत्नीच रूम घेऊ शकतील. सुधारित धोरणानुसार, सर्व जोडप्यांना 'चेक-इन'च्या वेळी त्यांच्या नात्याचा वैध पुरावा देण्यास सांगितले जाईल. यामध्ये ऑनलाइन केलेल्या बुकिंगचाही समावेश आहे. कंपनीने म्हटले आहे की ओयोने आपल्या भागीदार हॉटेलांना स्थानिक सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेऊन अविवाहित जोडप्यांकडून बुकिंग नाकारण्याचा अधिकार दिला आहे. Oyo ने मेरठमधील आपल्या भागीदार हॉटेल्सना याचे नियम तात्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. धोरणातील बदलाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले की, ग्राउंड प्रतिसादावर अवलंबून, कंपनी अधिक शहरांमध्ये त्याचा विस्तार करू शकते. ते म्हणाले, या समस्येचे निराकरण करण्यासाठी ओयोला विशेषत: मेरठमधील सामाजिक गटांकडून देखील प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय इतर काही शहरांतील रहिवाशांनीही मागणी केली आहे की, अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये चेक-इन करण्याची परवानगी देऊ नये. OYO उत्तर भारताचे क्षेत्र प्रमुख पावस शर्मा म्हणाले, सुरक्षित आणि जबाबदार आदरातिथ्य पद्धती राखण्यासाठी OYO वचनबद्ध आहे. आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्यांचा आदर करतो, परंतु या मार्केटमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि नागरी समाज गटांचे ऐकण्याची आणि काम करण्याची आमची जबाबदारी देखील ओळखतो. ते म्हणाले की कंपनी वेळोवेळी या धोरणाचा आणि त्याच्या परिणामाचा आढावा घेत राहील.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.