MARATHI

शेण खाण्यापलिकडचं! Views वाढवण्यासाठी मॉडेलने तोंडावर विष्ठा लावून सांगितले फायदे…

31 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने तिच्या विष्ठेचा वापर फेस मास्क म्हणून केल्याचे उघड केल्यानंतर ऑनलाइन संताप आणि अविश्वास निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या म्हणण्यानुसार, हा अपारंपरिक असा स्किनकेअर फेसपॅक तिची दिनचर्या असल्याच सांगितलं आहे. ब्राझीलची डेबोरे पेक्सिओटो असं या इन्फ्युएन्सरचं नाव आहे. आतापर्यंत मी केलेली सगळ्यात विचित्र गोष्ट असल्याचं पेक्सिकोटो सांगते. याअगोदर महिलेने मासिक पाळीच्या दिवसातील रक्त त्वचेला लावून ही स्किन ट्रिटमेंट असल्याचं सागंतिलं होतं. यामुळे देखील ही इन्फ्लुएन्सर चर्चेत होती. या दोन्ही गोष्टी कमी वयात येणाऱ्या वृद्धत्वावर मात करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर पेक्सिओटोला 658000 फॉलोअर्स असून तिच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या व्हिडिओत महिलेने फ्रिजमधून एक कंटेनर बाहेर काढलं. नंतर तिने त्यामधील विष्ठा आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावली. विष्ठेचा वास येऊ नये म्हणून तिने नाकाला पिन लावलं आहे. यानंतर चेहऱ्यावर ग्लो आल्याच दाखवलं आहे. A post shared by (@deborapeixoto.ofc) एवढंच नव्हे तर तरुणीने माझी स्किन यामुळे तजेलदार झाल्यांच म्हटलं आहे. एवढ्यावरच ती थांबली नाही तर आता हे माझं डेली रुटीन असल्याचं देखील ती म्हणाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी या विचित्र अशा सौंदर्य उपचारांवर त्वरित टीका केली आणि इशारा देखील दिला आहे की, अशा पद्धतीचा फेस पॅक चेहऱ्यासाठी हानिकारक आहे. यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ शकतो. लंडनमधील कॅडोगन क्लिनिकच्या सल्लागार त्वचाविज्ञानी डॉ सोफी मोमेन यांनी सांगितले की, "स्किनकेअरच्या 'ट्रेंड'पैकी, मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात विचित्रपैकी एक आहे." "फेस मास्क म्हणून विष्ठेचा वापर केल्याने तुमच्या त्वचेला फायदा होतो याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही." डॉ. मोमेन पुढे म्हणाले की, या चुकीच्या पद्धतीमुळे युझर्सना जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग, अन्न विषबाधा आणि त्वचेची जळजळ होऊ शकते. प्लॅस्टिक सर्जन यांनी सांगितले की, विष्ठेमध्ये हानिकारक जीवाणू, विषाणू आणि परजीवी असतात त्यासाठी असे करणे शरीरासाठी घातक आहे. कोलाई, साल्मोनेला आणि हेल्मिंथ असतात, ज्यामुळे गंभीर संक्रमण आणि रोग होऊ शकतात. प्लॅस्टिक सर्जनने सावध केले की, चेहऱ्यावर विष्ठा लावल्याने हे त्वचेसाठी घातक ठरु शकते. ज्यामुळे त्वचेचे गंभीर संक्रमण किंवा आजार होण्याची शक्यता असते.

WI
(91.5 ov) 233
(56.2 ov) 201/5
VS
SA
357 (117.4 ov)
173/3 dec (29.0 ov)
West Indies drew with South Africa
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.