MARATHI

एका दिवसाचा पगार 48 कोटी! भारतीय बनला सर्वात जास्त पगार घेणारा जगातील एकमेव व्यक्ती

Jagdeep Singh Salary : जगभरात सर्वात जास्त पगार हा CEO नोकरी करणाऱ्या व्यक्तीला मिळतो. सर्वात जास्त पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत सत्या नडेला, सुंदर पिचाई आणि एलॉन मस्क या दिग्गजांची नावे येतात. या सर्वांना एका भारतीय वंशाच्या CEO एका झटक्यात मागे टाकले आहे. भारतीय वंशाचे जगदीप सिंग (Jagdeep Singh) यांना एका दिवसाला 48 कोटी रुपये इतका पगार मिळतो. जगदीप सिंग यांच्या वर्षाच्या पॅकेजचा आकडा ऐकला तर चक्कर येईल. जगदीप सिंग हे जगातील सर्वात जास्त पगार घेणारा एकमेव ठरले आहेत. जगदीप सिंग हे भारतीय वंशाचे उद्योजक आहेत. 2010 मध्ये त्यांनी क्वांटमस्केप ( QuantumScape) नावाची कंपनी स्थापन केली. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारी (EV) सॉलिड-स्टेट बॅटरीच्या निर्मीतीचे काम करत. त्यांच्या कंपनीने बनवलेल्या बॅटरीने ईव्ही उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. चार्जिंगचा वेळ कमी करणे आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे ही त्यांच्या बॅटरीची सर्वात मोठी वैशिष्ट्ये आहेत. कल्पकतेच्या क्षेत्रातील लक्षणीय योगदानामुळे जागतिक स्तरावर त्यांना ओळख मिळाली आहे. जगदीप सिंग यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी अनेक मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये काम केले. यानंतर त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली. कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीने त्यांच्या क्वांटमस्केप कंपनीने एक यशस्वी टप्पा गाठला. व्यवसायच नाही तर तंत्रज्ञानाच्या नवनिर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. जगदीप सिंग यांची QuantumScape कंपनी 2020 मध्ये यूएस स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली. गुंतवणूकदारांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे कंपनीचे मूल्यांकन झपाट्याने वाढले. सिंग यांच्या पगाराच्या पॅकेजमध्ये 2.3 अब्ज डॉलर किमतीचे समभाग समाविष्ट होते. यानुसार त्यांना 17,500 कोटी रुपये इतका वार्षिक पगार मिळाल. दिवसाचा पगार हा साधारण 48 कोटी इतका आहे. जगदीप सिंग हे सर्वाधिक पगार घेणारे CEO ठरले आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये, जगदीप सिंग यांनी क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. कंपनीची जबाबदारी त्यांनी शिवा शिवराम यांच्याकडे सोपवली. क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला असला तरी ते सध्या 'स्टेल्थ स्टार्टअप'चे सीईओ आहेत. ही कंपनी AI अर्थात भविष्यातील तंत्रज्ञानावर काम करत आहेत.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.