MARATHI

कोलकाता रेप व हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; सुरक्षा रक्षकांसमोर मुख्य आरोपीने केला भलताच दावा

Kolkata Rape And Murder Case : कोलकत्ता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशभरातून वातावरण तापले होते. ट्रेनी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. सुरुवातील आरोपी संजय रॉय याने गुन्हा कबुल केला होता. मात्र, आता त्याने सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांना संजय रॉय याने वेगळीच कहाणी सांगितली आहे. त्यामुळं या प्रकरणातील गुंता अधिकच वाढत असल्याचे समोर येत आहे. कोलकाता प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. सीबीआय या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची रविवारी पॉलीग्राफ टेस्ट करणार आहे. खोट पकडणाऱ्या या टेस्टच्या आधीच आरोपी संजय रॉयने हत्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, त्याला यात अडकवण्यात येतंय मी निर्दोष आहे, असा दावा केला आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या हवाल्यानुसार, एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे की, संजय रॉयने तुरुंगातील गार्डना सांगितलं आहे की त्याला रेप आण हत्या प्रकरणाबाबत काहीच माहिती नाही. कोलकत्ता पोलिसांच्या म्हणण्यानुसार संजय रॉयने सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार व हत्या करण्याचा गुन्हा आरोपीन कबुल केला होता. तसंच, शुक्रवारी आरोपीने अतिरिक्त मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट कोर्टासमोर बेकसुर असल्याचा दावा केला होता. आरोपीने जजसमोर म्हटलं होतं की, बेकसुर असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याने पॉलीग्राफ टेस्टसाठीदेखील मंजुरी दिली होती. सीबीआय आणि पोलिसांनी संजय रॉय याच्या विधानावर विरोधाभास असल्याचे म्हटलं आहे. एका अधिकाऱ्याने मीडियाला म्हटलं आहे की, तपासअधिकाऱ्यांनुसार पोलिसांना व तपासयंत्रणांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच, आरोपीच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमा कशा आल्या याचे कारण संजय रॉयदेखील सांगू शकला नाही. शनिवारी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट काही तांत्रिक कारणांमुळं पूर्ण झाली नाही. शनिवारी आरजीकर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष आणि चार अन्य डॉक्टरांसह लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात आलं. संजय रॉयला कडेकोट सुरक्षेत कोलतत्ताच्या प्रेसीडेंसी जेलच्या सेल नंबर 21 मध्ये ठेवण्यात आलं आहे. पोलीस कोठडीत तो एकटाच आहे. बाहेर सीसीटीव्हीदेखील लावण्यात आले होते. संजय रॉयच्या सायकोलॉजीकल प्रोफाइलिंगमध्ये आढळलं आहे की, संजय रॉय एक विकृत व्यक्ती आहे. तसंच, त्याला पोर्नोग्राफीचे व्यसन आहे. एका सीबीआय अधिकाऱ्याने डॉक्टरच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, संजय रॉयच्या आत एक पाशवी वृत्ती आहे. मागच्या आठवड्यात सीबीआय अधिकाऱ्याने मीडियाला म्हटलं आहे की, संजय रॉयला अपराध केल्याचे कोणतेही पश्चात्ताप नव्हता. त्याने कबुली जबाबदेखील दिला आहे.

PAK
448/6 dec
(113.0 ov)
60/2
(23.0 ov)
VS
BAN
565
(167.3 ov)
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.