Safest Seat on Airplane : रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशाला कुठली सीट हवी आहे, याबद्दल आपण तिकीट बूक करताना त्यात सांगतो. पण विमानाचे तिकीट बूक करताना त्यात सीट सांगण्यात येत नाही. विमानात आपली सीट कुठली हे आपण बोर्डिंग केल्यानंतरच समजतं. उंच आकाशातून उडणारे या विमानातून प्रवास करताना अनेकांना भीती वाटते. त्यात जेव्हा जेव्हा विमान अपघाताच्या बातम्या येतात. तेव्हा मन अस्वस्थ होतं. हल्लीच झालेल्या दक्षिण कोरियात विमान अपघाताच्या बातमीने लोकांना धक्का बसला. या अपघातात 179 जणांना नाहक बळी गेलाय. अपघात होतील की नाही, ते टाळता येईल की नाही, हे आपण निश्चितपणे कधीच सांगू शकत नाही, मात्र विमान अपघातादरम्यान विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणती आहे याबद्दल संशोधकांनी दावा केलाय. फोर्ब्सच्या अहवालानुसार, जेव्हाही विमानातील जागा बुक करतो तेव्हा आमच्यासाठी विमानातून उतरणे किंवा चढणे किती सोयीचे असेल याचा आम्ही विचार करतो. कोणती सीट सुरक्षित आहे याचा आपण विचार करत नाही. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की विमानातील काही जागा इतरांपेक्षा सुरक्षित असतात, तिथे बसल्याने विमान अपघातात जीवही वाचू शकतो. अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने 1971 पासून 20 विमान अपघातांची तपासणी केली तेव्हा त्यांना असं आढळलंय की जे लोक विमानाच्या मागील सीटवर बसले होते त्यांच्या जगण्याची 69 टक्के शक्यता असतात. विमानाच्या समोर असलेल्या सीटवर बसलेल्यांची जगण्याची शक्यता फक्त 49 टक्के असते. जे विंगेजवळ बसले होते, त्यांची जगण्याची शक्यता 59 टक्के असते. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने 1985 ते 2000 या कालावधीत विमान अपघातांवर संशोधन केलं, त्यात वाचलेले आणि प्राण गमावलेल्या लोकांवर संशोधन करण्यात आलं. विमानाचा मागील भाग अधिक सुरक्षित असल्याचे त्यांचा संशोधनातून समोर आलंय. या जागी बसल्यास अपघाताच्या वेळी जगण्याची शक्यता जास्त असते. मध्यभागी बसणे देखील खूप फायदेशीर आहे. विमानाच्या मागच्या बाजूला मधल्या सीटवर बसलेल्यांचा मृत्यू दर 28 टक्के असतो. अपघात किती मोठा आहे यावर जीवित हानी अवलंबून असते. CNN च्या मते, मधली जागा अधिक सुरक्षित आहे कारण त्या दोन्ही बाजूंनी लोकांनी वेढलेल्या असतात, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता कमी होते. आता तुम्हाला समजलं असेल की विमानाच्या मागील बाजूस मधल्या सीटवर बसणे अधिक सुरक्षित आहे. पण विमान अपघात किती मोठा आहे आणि त्यातील कोणत्या भागाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, हेही महत्त्वाचे आहे. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, विमान डोंगरावर आदळले किंवा टोक थेट समुद्रात घुसले, तर जगण्याची शक्यता आणखी कमी होते. याशिवाय विमानात सुरक्षित राहण्यासाठी काही नियमांचे पालन करावं.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:


Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
January 7, 2025What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
-
- January 7, 2025
Featured News
Tuesday Panchang : आज मंगळवारी शिव योग! हनुमानजी अशी करा पूजा
- By Sarkai Info
- January 7, 2025
मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
- By Sarkai Info
- January 6, 2025
Latest From This Week
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MARATHI
- by Sarkai Info
- January 6, 2025
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.