MARATHI

भारतातील 'या' राज्यात जन्मलं देशातील पहिलं Generation Beta चं बाळ; कोण ठरवतं नव्या पिढीची नावं?

Beta Generation: जनरेशन बिटातील पहिले मूल मिझोरामची राजधानी असलेल्या आयझोलमध्ये जन्मले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच रात्री 12च्या ठोक्यानंतर सरकारी रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला आहे. या बाळाचे नाव फ्रँकी रेमरुआतदिका जेडेंग असं असून हा पिढीचा भारतातील पहिला बीटा जनरेशनच्या मुलगा ठरला आहे. 12 वाजून 3 मिनिटांनी त्याचा जन्म झाला आहे. फ्रँकी रेमरुआतदिका जेडेंग याचा जन्म झाला तेव्हा 3.12 किलोचा होता. फ्रँकीच्या जन्मानंतर खऱ्या अर्थाने बीटा जनरेशनची सुरुवात झाल्याचे म्हटलं जात आहे. बाळ आणि त्याची आई पूर्णपणे सुरक्षित असल्याचे रुग्णालयाने म्हटलं आहे. आकाशवाणी न्यूज आयझोलनुसार, फ्रँकीच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, मोठी बहिण यांचा समावेश आहे. तर, त्याचे संपूर्ण कुटुंब आयझोलच्या खटला येथील पूर्व भागात राहतात. आतापर्यंत पालक 'जनरेशन जी' आणि 'जनरेशन अल्फा' यातील अंतर शोधत होते, तेवढ्यात जनरेशन बीटा अस्तित्वात आले आहे. पिढ्यांची ही नावे ठरवण्यासाठी जागतिक पातळीवर अधिकृत अशी व्यवस्था नाही. पंरतु, कुणीतरी संकल्पना मांडते आणि ती नावे प्रचार-प्रसारातून जगभर प्रसिद्ध होत राहतात. २० वर्षाची एक पिढी मानली तर आधुनिक युगातील पिढ्यांची ही नावे अशीच प्रचलित झाली आहेत. जनरेशन बीटा म्हणजे जी मुलं 2025 ते 2039 या दरम्यान जन्माला येतील त्यांनी बीटा असे संबोधण्यात येईल. ही पिढी अधिक सक्षम व हुशार असेल. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात एआयच्या युगात जन्मलेली ही पहिली पिढी असेल. जनरेशन बीटाची मुलं स्मार्टफोन, इंटरनेट आणि ऑटोमेशनसह मोठे होतील. ते व्हर्चुअल रिअॅलिटी आणि अन्य तांत्रिक बाबीचा उपयोग करतील. त्यांच्या शैक्षणिक पद्धतीतही मोठे बदल होतील. जसं की क्लासरुममध्ये AI टुल्स असतील. जनरेशन बीटाची पिढी एका अशा जगात वावरतील जिथे टेक्नॉलॉजीचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम दिसून येईल. पृथ्वीचे वाढते तापमान, शहरांचा वाढता विस्तार, लोकसंख्या वाढ आणि तेवढ्या प्रमाणात मूलभूत सुविधांसह पायाभूत सुविधांची गरज ही आव्हाने जेन बीटा मुलांना पेलावी लागणार आहेत. मग त्यासाठी या पिढीला सतर्क राहावे लागेल, बदल स्वीकारण्याची सतत तयारी ठेवावी लागेल

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.