MARATHI

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच

Maharashtra Breaking News LIVE: राजकीय घडामोडींना वेग, राज्यातील ठळक घडामोडी जाणून घेऊयात. Maharashtra Breaking News LIVE: हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले आहे. त्यानंतर राज्यात इतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ठळक घडामोडी आणि अपडेट्स एका क्लिकवर 24 Dec 2024, 10:37 वाजता नीलकमल बोट दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून 35 प्रवाशांचे प्राण वाचवणारा 'देवदूत' आरीफ बामणे याचा आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आरीफने दाखवलेले प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचे कौतुक केले. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते. 24 Dec 2024, 10:36 वाजता विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. 26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबर पर्यत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक 24 Dec 2024, 10:35 वाजता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा फ्लॅट जप्त केला होता. हा फ्लॅट आधीच ईडीने जप्त केला होता आता ताब्यात घेतला आहे. 24 Dec 2024, 09:31 वाजता शहराच्या विविध भागातील ओढे-नाले, कालव्यांवर पुल आहेत, मात्र संबंधित पुलांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी, त्यामध्ये काय सुधारणा कराव्या लागतील यासाठी हे ऑडीट केले जाणार. नदी, नाल्यावर बांधलेले संबंधित पुलाची पाहणी महापालिकेकडुन केली जाणार 24 Dec 2024, 09:19 वाजता कसा असणार मनोज जरांगे यांचा दौरा २४ डिसेंबर संभाजी नगर, जालना, मंठा, परतूर, पाथरी, पुर्णा, दामपुरी मुक्काम २५ डिसेंबर आलेगाव, परभणी, साळेगाव, मस्साजोग, नागझरी, अंतरवाली 24 Dec 2024, 09:18 वाजता काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचा विचार सोडावा, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. एका इंग्रजी वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत मांडलं आहे. 24 Dec 2024, 09:17 वाजता नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं चित्र आहे.. साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसत असून पुढील आठ ते दहा दिवस शिर्डीत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे 24 Dec 2024, 08:58 वाजता उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील शासकीय प्रसूतीगृह ते व्हीनस चौक रस्त्यावर पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगातील एक स्विफ्ट डिझायर कारने दोन दुचाकी आणि एका रिक्षेला धडक दिली. यात कारमधील प्रवासी सुद्धा जखमी झाले. या सर्वांवर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालय आणि क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत 24 Dec 2024, 08:06 वाजता पुणे पुण्यातील लोहगाव येथील साठे वस्ती परिसरात कोयता आणि दगडाने अनेक वाहनांची तोडफोड करत दहशत करण्यात आलीय. दोन तरुणांनी या परिसरातील गाडी दुकाने आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कोयत्याने तोडफोड केली आहे 24 Dec 2024, 07:29 वाजता वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. दरम्यान, याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक शानचे निवासस्थान आहे. ही आग लागली तेव्हा शान घरात होता की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.