MARATHI

इंडिया गेटच नाव बदला; भाजप नेत्याने सुचवले नवे नाव

India Gate Delhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी काश्मीरचे नाव बदलण्याचे संकेत दिले आहेत. ‘काश्मीरला कश्यप यांची भूमी म्हणून संबोधलं जातं..काश्मीरचं नाव कश्यप यांच्या नावावरून पडलं असेल असं विधान अमित शाह यांनी केले आहे. त्यातच आता देशाची ओळख असेलेली राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटच नाव बदलण्याची मागणी करण्यात आली. भाजप नेत्याने नवे नाव सुचवले आहे. दिल्लीच्या इंडिया गेटच नाव बदला अशी मागणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केली आहे. जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीच्या इंडिया गेटच नाव बदलण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रात जमाल सिद्दीकी यांनी इंडिया गेटसाठी नवे नाव सुचवले आहे. इंडिया गेटच नाव बदलून भारत माता द्वार असे करावे अशी मागणी जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. इंडिया गेटची निर्मिती इंग्रजांनी केली होती. 1914 ते 1921 याकाळात झालेले पहिले महायुद्ध आणि तिसऱ्या आंग्लो-अफगाणिस्तान युद्धात ज्या ब्रिटिश भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने हे स्मारक उभारले होते. या युद्धांमध्ये भारताचे 80 हजारपेक्षा जास्त शहीद झाले होते. विसाव्या शतकातील महान ब्रिटिश वास्तुरचनाकार एडविन ल्युटन्स यांनी इंडियचा गेटचे डिझाईन तयार केले. हे स्मारक उभारण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला. 12 फेब्रुवारी 1931 रोजी तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी इंडिया गेटचे उद्‍घाटन केले.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.