MARATHI

युझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार?

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोट घेणार आहेत अशा चर्चा सुरु आहेत. त्याचं कारण म्हणजे युझवेंद्र चहलनं धनश्रीसोबतचे सोशल मीडियावरील सगळे फोटो हे डिलीट केले. त्या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. जर घटस्फोटाची बातमी खरी ठरली तर नियमांनुसार युजवेंद्र चहलला धनश्रीना पोटगी म्हणून किती प्रॉपर्टी द्यावी लागेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. युझवेंद्र चहल हा क्रिकेटपटू असून त्यातून तो खूप पैसे कमावतो. त्यात आयपीएल फ्रेंचायझीनं त्याला 18 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. त्याशिवाय जाहिरातीसाठी को मोठी रक्कम घेतो. दुसरीकडे धनश्रू ही लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. तिचे डान्स व्हिडीओ यूट्युबवर चांगलेच व्हायरल होतात. तिनं काही रिअॅलिटी शोमध्ये देखील काम केलं आहे. ती देखील अशा शोमधून वगैरे चांगली कमाई करते. आता दोघं घटस्फोटाच्या अफवा वाढल्या असताना त्या दोघांच्या चाहत्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. युझवेंद्र चहल आणि धनश्री या दोघांची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली आहे. त्यामुळे त्या दोघांनी जर घटस्फोट घेतला तर पोटगीचा निर्णय हा कोर्ट काय निर्णय घेतं त्यावर अवलंबून आहे. इथे धनश्रीचा निर्णय देखील महत्त्वाचा आहे. प्रॉपर्टीमध्ये विभागणी हा धनश्रीवर अवलंबून असेल. तिला पॉपर्टीमध्ये काही भाग हवाय की नाही? जर हवा असेल तर तिला कोर्टात जावं लागेल. दरम्यान, युझवेंद्र किंवा धनश्री या दोघांपैकी कोणीही घटस्फोटाच्या बातमीला अफवा किंवा दुजोरा दिलेला नाही. धनश्री वर्मा ही लोकप्रिय कोरिओग्राफर असून तिचं स्वत: चं एक युट्यूब चॅनल आहे. तिनं अनेक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या डान्स मुव्हसनं तिनं सगळ्यांची मने जिंकली होती. डेन्टिस्ट ते डान्सर असे तिने तिचे फॉलोवर्स मिळवले आहेत. धनश्रीच्या युट्यूब चॅनलला 27 लाख सब्सक्रायबर्स आहेत. तर तिला 62 लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स हे इन्स्टाग्रामवर आहेत. युझवेंद्रविषयी बोलायचं झालं तर तो एक लेग स्पिनर आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिमत्ता चॅम्पियनशिपमध्ये भारताचं त्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे. धनश्रीची नेटवर्थ ही 25 कोटी आहे. तर ब्रॅंड एन्डॉर्समेंटच्या मदतीनं ती चांगले पैसे कमावते. लवकरच दाक्षिणात्य चित्रपटातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. युझवेंद्र चहलची नेटवर्थ ही 70-80 कोटी आहे. युझवेंद्रला आयपीएल 2025 साठी पंजाब किंग्सनं 18 कोटी खरेदी केलं. साधारणपणे घटस्फोटाच्या खटल्यात पतीच्या कमाईची अथवा एकूण संपत्तीच्या 25 टक्क्यांपर्यंत वाटा हा पत्नीला पोटगी म्हणून दिला जातो. त्यामुळेच धनश्रीनं पोटगी मागितल्याच 25 टक्क्याच्या हिशोबानं चहलला 20 कोटींपर्यंत पोटगी द्यावी लागू शकते. मात्र, पोटगीचा निर्णय देताता महिला या आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहे याचा विचार करुन अंतिम निर्णय घेतला जातो. त्यामुळे वरील आकडेमोड हा केवळ एक अंदाज आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.