MARATHI

पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 3800000000000... संपत्तीचा आकडा वाचताना बोबडी वळेल

Elon Musk Networth : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे फक्त भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. मात्र, जगातील श्रीमंत व्यक्तीकडे मुकेश अंबानी यांच्या चारपट संपत्ती आहे. जगातील या सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव आहे इलॉन मस्क (Elon Musk). इलॉन मस्क यांनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे. इलॉन मस्कची संपत्ती 447 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. इलॉन मस्क हे पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ॲमेझॉनचे जेफ बेझोस हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. तरीही देखील जेफ बेझोस यांची संपत्ती इलॉन मस्क यांच्या आसपास देखील नाही. इलॉन मस्क यांची संपत्ती जेफ बेझोस यांच्यापेक्षा सुमारे 200 अब्ज डॉलर्स जास्त आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात 62.8 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मस्क यांच्याकडे 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती होती. मात्र, 24 तासात त्यांची संपत्ती 447 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान टेस्लाचे शेअर्सनी 4.50 टक्क्यांपेक्षा मोठी उसळी घेतली. यानंतर हे शेअर्स 420.40 डॉलरच्या उच्चांकावर पोहोचले. 4 नोव्हेंबर याच शेअर्सची किंमत 242.84 डॉलर इतकी होती. इलॉन मस्क 500 अब्ज डॉलर्सची भरारी घेणार लवकरच इलॉन मस्क 500 अब्ज डॉलर्सची भरारी घेणार आहेत. इलॉन मस्कची संपत्ती 447 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 500 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करण्यासाठी मस्क यांना 60 अब्ज डॉलर्सची गरज आहे. आकडेमोड केली असता मस्कच्या संपत्तीत दररोज 3.50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाल्यास फक्त 15 दिवसात ते 500 अब्ज डॉलर्स टप्पा सहज गाठू शकतात. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर सर्वात जास्त फायदा इलॉन मस्क यांना झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच टेस्लाचे शेअर्स 65 टक्क्यांनी वाढले आहेत. ट्रम्प सरकार इलेक्ट्रिक वाहनांवरील कर क्रेडिट काढून टाकण्याच्या विचारात आहे. या मोठा फायदा टेस्लाला कंपनीला होऊ शकतो. सेल्फ ड्रायव्हिंग कारला बूस्ट दिले जाईल.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.