MARATHI

'रडलो, अक्षरशः भीक मागितली....', 40 तास Digital Arrest; अंकुश बहुगुणासोबत घडला धक्कादायक प्रकार

Ankush Bahuguna Scam : गेल्या काही दिवसांपासून डिजिटल अरेस्टच्या अनेक घटना आपल्याला ऐकायला येत आहेत. त्याचा शिकार आता लोकप्रिय युट्यूबर अंकुश बहुगुणा झाला आहे. स्कॅमर्सनं त्याला 40 तास डिजिटल अरेस्टवर ठेवलं आणि त्याच्याकडून पैसे देखील चोरले. त्यानं त्याच्यासोबत झालेल्या एका घटनेविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितलं. त्याशिवाय त्यानं लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. स्कॅमर्सनं इंटरनॅशनल नंबरवरून कॉल करत त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. एका मित्राच्या मदतीनं तो या डिजीटल अरेस्टमधून बाहेर आला. याविषयी अंकुशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत अंकुशनं सांगितलं की इंटरनॅशनल नंबर ते ऑटोमेटेड कॉल आला होता. फोन उचलल्यानंतरच त्याला सांगितलं की त्याची कूरियर डिलिव्हरी कॅन्सल झाली आहे. मदत करण्यासाठी झीरो हा दाबा. झीरो दाबल्यानंतर कॉल कोणत्या स्कॅमरशी कनेक्ट झाला. ज्यात दावा करण्यात आला आहे की त्याच्या नावावर पाठवण्यात आलेल्या बेकायदेशीर माल घेऊन जाणारे, त्याचे कुरिअर कस्टमनं पकडलं आहे. या कूरियरसोबत त्याचा आधार आणि इतर काही खासगी माहिती जोडलेली आहे. त्यानंतर स्कॅमरनं अंकुशला 'डिजिटल अरेस्ट' केलं. स्कॅमरनं अंकुशवर मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग्सची तस्करी केल्याचा आरोप करत सांगितलं की त्याच्या विरोधात अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यानंतर स्कॅमरनं स्वत: ला पोलिस अधिकारी असल्याचं सांगत एक व्हिडीओ कॉलवर कनेक्ट करून दिलं. स्कॅमरनं अंकुशला त्याचं डिव्हाइस स्विच ऑफ करण्यास सांगितलं आणि त्याच्या माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. एकअशी वेळ आली जेव्हा स्कॅमरनं त्याला एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितलं. 'मी घाबरलो होतो, मला कळत नव्हतं काय होतंय आणि मी विचार करत राहिलो. हे नेमकं काय होतंय? काय होतंय मला कळलं नाही.' हे सगळं सांगतल असताना अंकुश म्हणाला, या सगळ्याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. 'त्यांच्यासमोर मी रडत होतो, भीक मागत होतो.' त्यांनी अंकुशला 40 तास एक डिजीटल अरेस्टमध्ये ठेवलं. स्कॅमरनं त्याला एक ट्रान्झॅक्शन देखील करण्यास सांगितलं. पण बॅंक बंद असल्यानं ते झालं नाही. त्यानंतर एका मित्रानं अंकुशशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा सगळा स्कॅम असल्याचं कळलं. हेही वाचा : 'कृष्णा माझा कोणी...', गोविंदानं भाच्याला मिठी मारताच सुनीताची संतप्त प्रतिक्रिया अंकुशनं त्याच्यासोबत घडलेली ही घटना सांगत खुलासा केला की त्याचे पैसे देखील गेले आणि त्याला मानसिक तनाव देखील झेलावा लागला. त्यानं लोकांना सांगितलं की तुमच्या आजुबाजूच्या लोकांना याविषयी माहिती द्या असं सांगितलं. जर कोणी व्यक्ती सरकारी अधिकारी किंवा पोलिस अधिकारी म्हणून तुम्हाला कॉल करत असेल तर सगळ्यात आधी ते खरंच आहे की नाही याचा तपास करा. कोणत्याही अनओळखी व्यक्तीला तुमचं खासगी किंवा व्यवाहारीक गोष्टींविषयी माहिती देऊ नका. असा कोणता कॉल आल्यास कायदेशीर संस्थांना कळवा. कोणत्याही प्रकारे सायबर क्राइमचा शिकार झाल्यास लगेच हेल्पलाइ नंबर 1920 वर संपर्क साधा.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.