WOMEN

Tara Bhavalkar : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ. तारा भवाळकर कोण आहेत?

Tara Bhavalkar : लेखिका डॉ. तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ६ ऑक्टोबर रोजी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत तारा भवाळकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं. दिल्ली या ठिकाणी पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. तारा भवाळकर कोण आहेत याची माहिती आपण जाणून घेऊ. तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. १९७० ते १९९० या कालावधीत तारा भवाळकर या श्रीमती चंपाबेन वालचंद शाह या सांगलीतील महाविद्यालयात डॉ. तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. लोकसाहित्य, लोकसंस्कृती यांच्या अभ्यासासाठी त्यांनी संपूर्ण आयु्ष्य खर्ची घातलं आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास, स्त्री मुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हे देखील डॉ. तारा भवाळकर यांच्या आवडीचे वि षय आहेत. स्त्रीवादी दृष्टीकोनातून संशोधन करुन लिहिणाऱ्या महत्वाच्या लेखिका म्हणूनही डॉ. तारा भवाळकर यांची ओळख आहे. अलिकडेच त्यांनी सीतायन हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी सीतेच्या वेदना आणि विद्रोह यांचं चित्रण केलं आहे. सांगलीत प्रायोगिक नाट्यसंस्था सुरु करण्यातही तारा भवाळकर यांचा सहभाग होता. हे पण वाचा- अन्वयार्थ: मातृपरंपरेच्या अभ्यासाचा (जरा उशिराच) गौरव डॉ. तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) यांनी चाळीसहून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. ‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’, ‘महामाया’, ‘आकलन आणि आस्वाद’, ‘लोकपरंपरेतील सीता’, ‘माझिये जातीच्या’, ‘लोकनागर रंगभूमी’, ‘मातीची रुपे’ ही त्यांची पुस्तकं चर्चेत राहिलेली आहेत.डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ मध्ये झाला. प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये अतिथी प्राध्यापक देखील होत्या. या पुरस्कारांनी डॉ. तारा भवाळकर ( Tara Bhavalkar ) यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी साहित्यविश्वात मोलाचं योगदान देणाऱ्या डॉ. तारा भवाळकर या आता दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.