WOMEN

दिवाळीत पाहुण्यांना घरी बोलावताय? या टीप्स नक्की लक्षात ठेवा…

तुमच्याकडे पाहुणे येणार असतील त्या वेळेआधी स्वत: तयार व्हा. घरातलं, स्वयंपाकाचं करता करता पाहुणे येईपर्यंत घरच्या जुन्या कपड्यांत राहू नका. पुरेशी तयारी करून उत्साहाने पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. त्यादिवशी घरातले सगळेजण कोणते कपडे घालणार आहेत हे आधीच ठरवा. तुम्ही साडी नेसणार असाल वा ड्रेस घालणार असाल तर त्यावरची ज्वेलरी, मेकअप या सगळ्याचा नीट विचार करा. ऐनवेळेस पार्लरला जाऊन तयार होण्याची गडबड टाळा घरोघरी आकाशकंदिल लागले असतील, अंगणात रांगोळ्या काढल्या गेल्या असतील, फराळाचे पदार्थही तयार असतील. आणि आता सगळेचजण वाट बघत असतील जीवलगांच्या भेटीची. दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उत्सव नसतो, तो असतो नात्यांचा उत्सव. एकमेकांना भेटण्याचा उत्सव. नोकरीच्या, करियरच्या गडबडीत, एरवीच्या धकाधकीच्या आयुष्यात वर्षभर कुणाला भेटायलाही वेळ मिळत नाही. पूर्वीसारख्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्या तरी पूर्वीसारखं शांत, निवांत आयुष्य नसतं. त्यामुळेच मग दिवाळीच्या निमित्ताने आवर्जून कुटुंबीय, दुरावलेले नातेवाईक, मित्रपरिवाराच्या भेटी होतात. तुमच्याकडेही असंच काही ठरलं असेल ना? आता चार पाहुणे येणार म्हटल्यावर मस्त मेजवानी तर हवीच ना. पण सुट्टी, घरातली आवराआवर, कामाची धावपळ या सगळ्यामध्ये हे जास्तीचं काम करणार तरी कसं? सगळं जेवण बाहेरून मागवणं हा पर्याय असू शकतो. पण त्याचबरोबर तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी नीट प्लॅन केल्या तर तुमचं गेट-टुगेदर छान तर होईलच, पण तुम्हीही त्यात पूर्णपणे सहभागी होईन एन्जॉय करू शकाल. हे ही वाचा… स्त्री आरोग्य : लघवीच्या ठिकाणी खाजतंय? दुर्लक्ष करू नका घरी कोणी पाहुणे येणार म्हटल्यावर घरातल्या बाईने पूर्णपणे घरातच अडकायला हवं असं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर आवरायला, सजावट करायला घरच्यांची मदत घ्या. मुलांवर त्यांना जमतील अशी कामं सोपवा. जेवायला किती जण येणार आहेत, लहान मुलं आहेत का, मोठी माणसं किती, कोणत्या वेळेस येणार आहेत, या सगळ्याचा विचार करून मेन्यू ठरवा. दिवाळीत फराळ खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यामुळे फराळाच्या पदार्थांवर फार भर देऊ नका. उलट चमचमीत, करायला सोपे, सगळ्यांनाच आवडतील असे पोटभरीचे पदार्थ ठरवा. त्यासाठीची तयारी आधीच करून ठेवा. जास्त लोक असतील तर थोडे पदार्थ घरी करून काही बाहेरून ऑर्डर करता येतील का याचा विचार करा. उत्तम स्वयंपाक करणाऱ्या अनेक महिला पदार्थांच्या अशा ऑर्डर घेत असतात. दिवाळीच्या दिवसांत हॉटेलमधून काही मागवण्यापेक्षा अशा महिलांना काही ऑर्डर दिल्यास त्यांनाही हातभार लागेल आणि तुमचं कामही सोपं होईल. विशेषत: पोळ्या किंवा पुऱ्या बाहेरून मागवल्यास खूप मोठं काम हलकं होऊ शकतं. जेवण्याची सोय कुठे करणार आहात, ताटं कोणती वापरणार आहात, नंतर ती धुऊन ठेवण्याची सोय काय किंवा यूज अँड थ्रोचा वापर करणार आहात का? याचाही विचार करा. जर सगळे पदार्थ घरी करणार असाल तर लसूण सोलणे, भाज्या निवडणे, चिरणे यासाठी मदत घ्या. आधीच पदार्थ ठरवल्यास त्याप्रमाणे सामान आणून एक दिवस आधीपासून तयारी केलीत तर ऐनवेळेसची धावपळ, गडबड टाळली जाऊ शकते. गोडाचा पदार्थ करणार असाल तर शक्यतो तो आधीच करुन ठेवून द्या, पण खराब होणार नाही याची दक्षता घ्या. जेवताना लहान मुलांना, वयस्कर व्यक्तींना बसण्याची सोय काय असेल याचा आधीच विचार करा. बाहेरून जेवण/ पदार्थ मागवणार असाल तर खात्रीलायक ठिकाणाहूनच मागवा. दिवाळीसारख्या सणांच्या दिवसांत सगळीकडेच गडबड असते. नवीन हॉटेल्स, चव माहिती नसलेले पदार्थ मागवू नका. काही केटरर्स जेवणाबरोबरच भांडी, वाढपीही पुरवतात. तुमच्या पाहुण्यांची संख्या आणि बजेटनुसार त्याबाबत निर्णय घ्या. तुमच्याकडे पाहुणे येणार असतील त्या वेळेआधी स्वत: तयार व्हा. घरातलं, स्वयंपाकाचं करता करता पाहुणे येईपर्यंत घरच्या जुन्या कपड्यांत राहू नका. पुरेशी तयारी करून उत्साहाने पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. त्यादिवशी घरातले सगळेजण कोणते कपडे घालणार आहेत हे आधीच ठरवा. तुम्ही साडी नेसणार असाल वा ड्रेस घालणार असाल तर त्यावरची ज्वेलरी, मेकअप या सगळ्याचा नीट विचार करा. ऐनवेळेस पार्लरला जाऊन तयार होण्याची गडबड टाळा. मुलांना आधीपासून व्यवस्थित तयार करून त्यांना पाहुण्यांच्या स्वागताच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या द्या. पाणी नेऊन देणे, त्यांच्याशी बोलणे या गोष्टी त्यांना समजावा. हे ही वाचा… सहमतीने घटस्फोटाकरता प्रत्यक्ष हजेरी आवश्यक नाही गेट टुगेदर म्हणजे फक्त खाणं-जेवण नसतं. सगळ्यांना सहभागी होता येतील असे काही छान पार्टी गेम्स ठरवा. गेम जिंकल्यानंतर छोटी छोटी बक्षिसं द्या. मुख्य म्हणजे सगळ्यांची आवर्जून विचारपूस करा. जाताना तुमच्याकडून एखादी छोटीशी प्रेमाची भेटवसतू द्या. सणासुदीला आपल्या माणसांची भेट होणं, त्यांच्यासोबत वेळ घालवता येणं हे हल्लीच्या दिवसांमध्ये खूप मोलाचं आहे. दिवाळीच्या निमित्ताने जीवलगांची झालेली भेट पुढच्या वर्षभरासाठी भरपूर एनर्जी देऊन जाणारी ठरते. वर्षभर आपल्या होणाऱ्या दगदगीवर, धावपळीवर खरं तर हे एक उत्तम टॉनिक असतं. हे टॉनिक प्रत्येक घरातल्या प्रत्येक स्त्री साठीही तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही जर गेट-टुगेदर ठरवलं असेल तर या छोट्या टीप्स नक्की लक्षात ठेवा आणि तुमची दिवाळी पार्टी तुम्हीही एन्जॉय करा… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.