WOMEN

निसर्गलिपी : इनडोअर – आऊटडोअर झाडांची रचना

आपली बाग सजवताना त्यात झुलत्या रचनेचा समावेश केला तर बागेला एक वेगळचं रूप येतं. एकतर या हलवा हलव करायला सोप्या पडतात आणि दुसरं म्हणजे हवी ती रंगसंगती साधत त्यांची रचना सतत बदलता येते. कमी जागेतली बाग हँगिंगने सजवता येतेच, पण कमी जागेत किचन गार्डन करायची असेल तरीही हँगिंगचा उपयोग करता येतो. ही बाग तयार करताना पहिल्यांदा निवडायची ती झाडं. भरपूर ऊन येत असेल तर आऊटडोअर प्लांट निवडावीत, बेताचं ऊन येत असेल तर वेलवर्गीय झाडांची निवड करता येईल. अजिबातच ऊन येत नसेल तर मग सक्युंलंटस् निवडावीत. एकदा रोपं कोणतं लावायच हे ठरलं की कुंड्यांची निवड करावी. हलक्या, भारी अशा दोन्ही प्रकारातील कुंड्या बाजारात उपलब्ध असतात. छोट्या मातीच्या बाऊल किंवा उरळीवर सुरेख पेंटिंग करून त्याचा वापर यासाठी आपण करू शकतो. हेही वाचा – स्तनपान करणार्‍या अपत्याचा ताबा आईकडेच! पुढचा टप्पा म्हणजे माती. नर्सरीतून तयार रोपं आणलं तरी त्याची माती बदलणं गरजेचं असतं. मागील लेखात मी सांगितलं तसं त्यात बहुतांशी कोकोपीट वापरलेलं असतं. कोकोपीटमधे झाड टिकून राहतं, पण त्याचं पोषण मात्र होतं नाही. त्यामुळे माती ही बदलायलाच हवी. नवीन झाडं आणल्या आणल्या लगेच माती बदलायला घेऊ नये. काही दिवस त्या झाडाला आपल्या इथल्या वातावरणात रूळू द्यावं. मग त्यांच्या प्रकाराप्रमाणे माती तयार करून त्यात ते लावावं. माती बदलल्यानंतर लगेच ते प्रखर उन्हात न ठेवता टप्प्या टप्प्याने त्याला ऊन दाखवत मग त्याची जागा निश्चित करावी. माती तयार करताना उत्तम कंपोस्ट, वाळक्या काड्या, वाळलेला पालापाचोळा आणि थोडं मिळालं तर गांडूळ खत यांचा वापर करावा. यातले एखादं दोन घटक नसले तरी हरकत नाही. जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा ते आलटून पालटून वापरले तरी झाडाला पोषण मिळत राहतं. कस ते पाहा. कंपोस्ट किंवा गांडूळखत वापरल्याने पोषण तर मिळेल, पण वाळक्या काड्या यासुद्धा फार उपयुक्त आहेत. या काड्या अतिशय सावकाश कुजतात आणि त्या प्रक्रियेत मातीला लिग्निन मिळतं. वाळलेला पालापाचोळा तर दोन प्रकारे मदत करतो. एक म्हणजे कुंडीचं वजन कमी करतो आणि सावकाश कुजत राहून रोपांचं पोषण करतो, शिवाय हवाही खेळती राहण्यास मदत होते. कंपोस्ट, गांडूळखत हे जर वेळेवर नाही मिळालं तर सुकलेल्या शेणाचा चुराही आपण वापरू शकतो. आता या उपलब्ध साहित्यातून कुंडी भरल्यानंतर सगळ्यात शेवटी हलकासा कोकोपीटचा थर द्यायचा. हा अशासाठी की कोकोपीट पाणी धरून ठेवतं. त्यामुळे पाण्याचा ताण रोपाला जाणवत नाही. एखाद दोन दिवस पाणी देणं राहिलं तरी रोपांचं नुकसान होत नाही. एकदा अशा प्रकारे माती तयार केली की ती जवळपास सगळ्या प्रकारच्या रोपांसाठी वापरता येईल. यात आवर्जून एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे बागेतील माती म्हणजे आपली नेहमीची माती मुळीच वापरायची नाही. बागेतील माती किंवा ज्याला गार्डन सॉईल म्हणतात ती वापरली तर पाणी देतेवेळी ती वाहून जाते तिचे ओघळ येऊन गच्ची, गॅलरी किंवा मग भिंत खराब होऊ शकते. हेही वाचा – दिवाळी: अर्थात नात्यांचा उत्सव इनडोअर – आऊटडोअर दोन्ही प्रकारासाठी वरीलप्रमाणे माती तयार करायची, पण सक्युलंटस् लावणार असाल तर मात्र माती तयार करताना एक भाग वाळू जरूर वापरावी. ही वाळू म्हणजे समुद्री बारीक पुळण नव्हे तर खाडीतील छोटे छोटे दगड असलेली रेती वापरावी. यात कोळसा, थोडं वाळलेलं शेवाळंही वापरता येईल. सक्युलंटस् ही आपल्या पानांमध्ये पाणी साठवतात त्यामुळे त्यांना पाणी अतिशय कमी द्यावं लागतं. गच्च ओली जमीन त्यांना मानवत नाही. म्हणून रेतीचा वापर करायचा. सक्युलंटस्ची योग्य माती तयार केली की मग त्यात जेड कलेंच्यू, ब्रम्हकमळ अशी आकर्षक रोपं सहज लावता येतात. जेडला उत्तम आकार देता येतो. त्याने बागेची शोभा तर वाढतेच, पण रचेनेचे वैविध्यही साधता येते. mythreye.kjkelkar@gmail.com None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.