WOMEN

बिनधास्त, निसर्गप्रेमी मलाइका वाझ

सोनाली देशपांडे मलाइकाचं व्यक्तिमत्त्व खूपच धाडसी आहे. एका मुलाखतीत तिनं म्हटलंय, ‘माझा जन्म धाडसासाठीच झाला आहे.’ समाजासाठीही ती सतत काही ना काही करत असते. २०१५ च्या एप्रिलमध्ये नेपाळमध्ये खूप मोठा भूकंप आला. त्यावेळी नेपाळ अक्षरश: उद्ध्वस्त झाला होता. तेव्हा शेरपा समूदायाच्या मदतीसाठी तिनं गिर्यारोहणाचा मोठा कार्यक्रम केला होता. लडाखमधल्या स्टोक आणि लुंगसेर पर्वतांवर गिर्यारोहण करून मदत गोळा केली होती. आर्टिक आणि अंटार्टिकवर पोचलेली मलाइका सर्वात तरुण व्यक्ती ठरली. त्याबद्दल लिमका बुक ऑफ वर्ल्डनं तिची दखल घेतली. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहिला होता. २७ वर्षांची एक तरुणी आपल्या हातात सापाला खेळवत होती. त्याच्याबद्दल माहिती देत होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. उलट त्या सर्पाबद्दल अपार माया दिसत होती. अर्थातच, ती होती मलाइका वाझ. नुकताच तिला वन्यजीव माहितीपटासाठी ग्रीन ऑस्कर पुरस्कार मिळाला. ‘द सॅक्रिफाइस झोन’ या माहितीपटासाठी जागतिक स्तरावरचा मानाचा ‘वाइल्ड स्क्रीन पांडा पुरस्कार’ तिने पटकावला. इंग्लंडच्या ब्रिस्टल शहरात हा पुरस्कार सोहळा पार पडला. काय आहे ‘द सॅक्रिफाइस झोन’ ? यात चार कुटुंबाची कथा आहे. नवी दिल्ली, ढाका, बॅटन रुज (अमेरिका),ला गुजिरा ( कोलंबिया ) इथल्या कुटुंबाची ही गोष्ट. प्लॅस्टिकसारख्या पर्यावरण दूषित करणाऱ्या घटकांमुळे ही कुटुंबं त्रस्त आहेत. हा माहितीपट पर्यावरण प्रदूषित करणाऱ्या व्यवसायामुळे आर्थिक लाभ कसा कमी होतो आणि याचा त्रास हा व्यवसाय करणाऱ्यांनाच जास्त होतो, यावर प्रकाशझोत टाकतो. हेही वाचा : आई म्हणून मीच एकटी दोषी का रे! मलाइका वाझ ही मूळची गोव्याची. उत्तर गोव्यात साळगावमध्ये ती वाढली. शारदा मंदिर शाळेत तिचं शिक्षण झालं. त्यानंतर यूडब्लूसी महिंद्रा काॅलेजमध्ये ९२ देशांतल्या विद्यार्थ्यांबरोबर तिचं शिक्षण झालं. मारुशा वाझ आणि मॅक वाझ तिचे आईवडील. मिखाइल आणि मार्क तिचे दोन भाऊ. नॅशनल जिओग्राफी चॅनेलसाठी ती माहितीपट तयार करते. वन्यजीव संवर्धन आणि जोपासना तिच्या आयुष्याचं ध्येय, हे तिला खूप लवकर कळलं. गोव्यात वाढलेल्या मलाइकाला मांता रे नावाच्या माशाची अतिरिक्त प्रमाणात शिकार केली जाते, हे तिच्या लक्षात आलं. त्यासाठी तिने मासे व्यापारी बनून चीन, म्यानमार आणि भारतातल्या तस्करांचा शोध घेतला. यावर पँग यू साई हा माहितीपटही केला. मागे एकदा याच माहितीपटाला ग्रीन ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं. २०१८ मध्ये तिनं ॲनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी चॅनेलसाठी ‘ऑन द ब्रिंक’ ही टीव्ही सीरिज केली होती. त्यात भारतात लुप्त होणाऱ्या वन्यजीवांसाठी काम करणारे संशोधक आणि वैज्ञानिकांबद्दल होतं. त्यांच्यामुळे तिने नॅशनल जिओग्राफी एक्सप्लोरल म्हणून लिव्हिंग विथ प्रिडेटर्स ही सीरिजही बनवली होती. माणूस आणि वन्य जीव यांच्या एकमेकांबरोबरच्या अस्तित्वाबद्दल तिनं यात मांडलंय. मलाइका म्हणते, ‘आपल्याला ठराविक पर्यावरणवादी नकोत. तर पर्यावरणावर, वन्य जीवांवर प्रेम करणारे असंख्य लोक हवेत. तरच बदल होऊ शकतो. प्रत्येकानं आपापल्या परिसरात बदल केले तरीही मोठं काम होऊ शकतं.’ मलाइकाचं व्यक्तिमत्त्व खूपच धाडसी आहे. एका मुलाखतीत तिनं म्हटलंय, ‘माझा जन्म धाडसासाठीच झाला आहे.’ समाजासाठीही ती सतत काही ना काही करत असते. २०१५ च्या एप्रिलमध्ये नेपाळमध्ये खूप मोठा भूकंप आला. त्यावेळी नेपाळ अक्षरश: उद्ध्वस्त झाला होता. तेव्हा शेरपा समूदायाच्या मदतीसाठी तिनं गिर्यारोहणाचा मोठा कार्यक्रम केला होता. लडाखमधल्या स्टोक आणि लुंगसेर पर्वतांवर गिर्यारोहण करून मदत गोळा केली होती. आर्टिक आणि अंटार्टिकवर पोचलेली मलाइका सर्वात तरुण व्यक्ती ठरली. त्याबद्दल लिमका बुक ऑफ वर्ल्डनं तिची दखल घेतली. हेही वाचा : दिव्यांगांना हक्काचं काम मिळवून देणारी अलीना… मलाइका ‘क्रिया’ या संस्थेसाठी काम करते. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया, संकटात असलेल्या तरुणी यांना सक्षम करण्याचं काम मलाइका या संस्थेद्वारे करत असते. मलाइका म्हणते, ‘आपण या निसर्गाचा एक भाग आहोत. त्यामुळे त्याचं संवर्धन, प्राणी, मासे यांची जोपासना करणं हे आपलं कामच आहे. ते प्रत्येकानंच करायला हवं.’ गोव्यात समुद्रकिनारी वाढलेल्या मलाइकाला समुद्राचं आकर्षण आहे. वयाच्या १२ व्या वर्षी ती पहिल्यांदा समुद्राच्या तळाशी गेली होती. तिथली नयनरम्य दुनिया पाहायला. मांता रे माशाला वाचवण्यासाठी तिनं मोठी चळवळ केली, पण या माशाची आणि तिची पहिली भेट झाली ती मालदिव्जच्या समुद्रात. मलाइका म्हणते, ‘ मालदिव्जच्या समुद्रात मी पोहत असताना अचानक एक मोठी काळी सावली माझ्याकडे येताना दिसली. तो मांता रे मासा होता. त्यालाही माझ्याबद्दल उत्सुकता असणार. मी तर थिजूनच गेले होते. पण तेव्हापासून मी त्याच्या प्रेमात पडले.’ मलाइका वाझला फिल्म मेकिंगमध्ये रस आहे. म्हणूनच तिनं काॅलेजला राम राम ठाकून प्राॅडक्शन कंपनीत नोकरी स्वीकारली. वेगवेगळे माहितीपट ती बनवत असते. Nat Geo Wild मागे मलाइकाचं योगदान मोठं आहे. ती म्हणते, ‘कॅमेरा माझं पॅशन आहे. वेगवेगळ्या स्टोरीज लोकांपर्यंत पोचवून नवा दृष्टिकोन देणं मला आवडतं.’ मलायका लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती अशा सगळ्या भूमिका निभावत असते. कोविडच्या काळात स्थलांतरीत होणाऱ्या कामगारांवरही तिनं एक माहितीपट केला होता. हेही वाचा : स्त्री आरोग्य: गर्भवतीची काळजी घेताना… मलाइका वाझ निसर्गात रमते. तिथले बारकावे, वन्य जीवांचे संघर्ष पाहते. माणूस आणि वन्य जीव एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, हे तिला ठाऊक आहे. पर्यावरणासाठी काय करता येईल, हे ती तिच्या माहितीपटांत मांडते. निसर्ग आणि फिल्म मेकिंग या दोन्ही गोष्टींवर तिचं प्रचंड प्रेम आहे आणि यांचा मेळ साधून ती जनजागृती करण्याचा प्रयत्न करते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.