WOMEN

Women MLA In Jammu Kashmir : शगुन, शमीमा आणि सकिना; जम्मू काश्मीरमधील विधानसभेत या तिघींचा घुमणार आवाज!

Women MLA in Jammu Kashmir : दहशतवादी कारवायांमुळे सतत दहशतीत असलेल्या केंद्रप्रदेशित राज्यात तब्बल १० वर्षांनी निवडणुका झाल्या. कलम ३७० रद्द केल्यानंतरची ही पहिली निवडणूक. त्यामुळे तेथील समस्या, नागरिकांच्या मागण्या अन् राज्यातील शांतता सुव्यवस्था राखण्याकरता नागरिकांनी जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षावर विश्वास दाखवला आहे. ९० सदस्यांच्या या विधानसभेत फक्त तीन महिला निवडून गेल्या आहेत. त्यापैकी एक भाजपाची असून दुसरी जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या आहेत. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत फक्त दोन महिला आमदार विधानसभेत जिंकून गेल्या होत्या. तर, यंदा ४१ महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी तिघींचा विजय झाला आहे. शमीमा फिरदौस आणि सकीना इटू या दोघी नॅशनल कॉन्फरन्सच्या असून शगुन परिहार या भाजपाच्या आहेत. ९० सदस्यांच्या विधानसभेत फक्त ३.३३ टक्के महिला आमदार आहेत. भाजपा नेत्या शगुन परिहार यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे दिग्गज नेते व माजी मंत्री सजाद अहमद किचलू यांना ५२१ मतांनी पराभूत करून, किश्तवाड मतदारसंघ जिंकला. किश्तवाड हा मुस्लीमबहुल मतदारसंघ आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, मुस्लीमबहुल जागेवर परिहार यांना २९,०५३ मते मिळाली; तर किचलू यांना २८,५३२ मते मिळाली. जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत विजयी झालेल्या तीन महिलांपैकी त्या भाजपाच्या एकमेव महिला उमेदवार आहेत. परिहार यांचे वडील अजित परिहार आणि काका अनिल परिहार हे पंचायत निवडणुकीच्या आधी १ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. त्यांचे काका हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते; ज्यांना जिल्ह्यातील मुस्लीम समाजाचा काही प्रमाणात पाठिंबा होता. सध्या शगुन परिहार या इलेक्ट्रॉनिक्समध्ये पीएच.डी. करीत आहेत आणि त्यांनी इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये एम. टेक. ही पदवीदेखील मिळवली आहे. त्या जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी करीत आहेत. परिहार यांनी आपले संपूर्ण लक्ष शैक्षणिक क्षेत्रावर केंद्रित केले होते. त्यांची राजकारणात येण्याची कोणतीही योजना नव्हती. परंतु, समाजाप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव आणि राजकारणातील कौटुंबिक वारसा यांमुळे त्या निवडणुकीत उतरल्या. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण ९२.४ लाख रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. हेही वाचा >> दहशतवाद्यांकडून वडिलांची हत्या; मुस्लीमबहुल मतदारसंघात विजयी झालेल्या भाजपाच्या शगुन परिहार कोण? नॅशनल कॉन्फरन्सच्या वरिष्ठ नेत्या शमीमा फिरदौस या पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी श्रीनगर जिल्ह्यातील हब्बाकडल मतदारसंघात भाजपाच्या अशोक कुमार भट यांचा ९ हजार ५३८ मतांनी पराभव केला. २००८ आणि २०१४ साली विधानसभा निवडणुकतही शमीमा यांना ही जागा मिळाली होती. २०१४ नंतर पक्षाच्या हातून सत्ता गेल्यानंतर श्रीनगर आणि काश्मीर खोऱ्यातील काही भागात त्या फार सक्रिया होत्या. यामुळे पक्षाला अधिक बळ मिळालं. त्याचा फायदा निवडणुकीत झाला. २००८ ते २०१४ च्या काळात नॅशनल कॉन्फरन्स पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीतील सरकारमध्ये त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाही होत्या. नॅशनल कॉन्फरन्सच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मंत्री सकिना इटू यांनी डीएच पोरा विधानसभा मतदारसंघात चांगली फाईट दिली. त्यांना ३६ हजार ६२३ मते मिळाली तर. तर १७ हजार ४४९ मतांनी त्यांचा विजय झाला. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे गुलझार अहमद डर यांचा त्यांनी परभाव केला आहे. जम्म काश्मीरच्या विविध विभागाच्या त्या मंत्री राहिल्या आहेत. समाज कल्याण विभाग, प्रशासकीय सुधारणा, शिक्षण आणि पर्यटन आदी विभागाचा त्यांना अनुभव आहे. १९९६ साली वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या जम्मू काश्मीर विधानसभेतील सर्वांत तरुण महिला आमदार ठरल्या होत्या. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.