MAHARASHTRA

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने कोणतंही ठोस…”

Santosh Deshmukh Case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहात आवाज उठवला. यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिलं. यावेळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? याचा घटनाक्रम सांगत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. तसेच बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचे आदेश दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच या घटनेची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा देखील फडणवीसांनी केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर सभागृहात केलेल्या भाषणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलं नसून फक्त गोल गोल भाषण केलं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. हेही वाचा : Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांची हत्या कशी झाली? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम; एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीची घोषणा बीडच्या घटनेबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “विरोधकांनी बीडच्या घटनेबाबत सभागृहात माहिती दिली. ती माहिती खरी समजून त्यावर ठोस कारवाई केल्याचं निदर्शनास येत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करायची अशा दोन चौकशीची काय आवश्यकता? न्यायालयीन चौकशीच करायला पाहिजे. आता एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, हे एकंदरीत गोल गोल उत्तर होतं. त्यामुळे निष्कर्षापर्यंत सरकार येत नाही”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. “सभागृहात जी सर्व भाषणं झाली. त्या सर्व प्रश्नांना ठोस उत्तर मिळणं अपेक्षित होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे उत्तर दिलं. त्यामध्ये असा जोरकसपणा नव्हता, म्हणजे आम्ही एवढ्या दिवसांत कारवाई करू, २४ तासांत अटक करू किंवा ४८ तासांत अटक करू, असं ठोस आश्वासन त्यांनी दिलं नाही. एवढंच नाही तर संपूर्ण भाषणात अटक करण्यासंदर्भात त्यांनी शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे आता पाहू सरकार काय कारवाई करतं. बीडच्या घटनेत काय काय झालंय हे माहिती असूनही मु्ख्यमंत्र्यांनी सविस्तर सांगितलं नाही. फक्त गोल गोल भाषण करून उत्तर दिलं”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. “बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढवी लागणार आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी आपण पाहिली तर एका कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. मात्र, काही लोक यासंदर्भात खंडणी द्या अशा परिस्थितीत वावरताना दिसतात. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान पवन चक्कीच्या कंपनीचं ऑफीस असलेल्या ठिकाणी या घटनेतील आरोपी गेले. त्यानंतर त्यांनी एका सुरक्षारक्षकाला आणि एका कंपनीच्या मॅनेजरला मारहाण केली. त्यानंतर मॅनेजरने तेथील सरपंचाना फोन केला. त्यानंतर सरपंच यांच्याबरोबर काही लोक आले मग त्यांनी त्या आलेल्या लोकांना बाचबाची केली. यानंतर ९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख हे त्यांच्या गाडीतून जात असताना काळ्या रंगाच्या दोन गाड्यांनी त्यांचा पाटलाग केला आणि संतोष देशमुख यांची गाडी थांबवून त्यांना मारहाण केली. त्यावेळी सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ हा आरोपी विष्णु चाटेच्या संपर्कात होता. तेव्हा आरोपी सांगत होता की १५ मिनिटात सोडतो. मात्र, त्यांनी संतोष देशमुख यांना सोडलं नाही आणि त्यानंतर मारहाणीत देशमुख यांचा मृत्यू झाला”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोणी असला तरी त्याला शिक्षा होईल. तसेच मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह एसआयटीच्या माध्यमातून आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.