MAHARASHTRA

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं नॉनव्हेज खाणाऱ्यांना घरे नाकारणाऱ्यांबद्दल मोठं वक्तव्य; सरकारची भूमिका मांडताना म्हणाले…

Devendra Fadnavis Latest News : कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी एका मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. मराठी माणसांवर महाराष्ट्रातच अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावर विधिमंडळात देखील चर्चा झाली. आज (२० डिसेंबर) विधान परिषदेत बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांनी कल्याणमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी परब यांनी नॉनव्हेज खाणाऱ्यांना सोसायटीमध्ये घर दिलं जात नसल्याचा मुद्दा मांडत यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर सरकारची भूमिका सभागृहासमोर मांडली. विधान परिषदेत बोलताना अनिल परब यांनी कल्याणमधील कालचं प्रकरण हे मराठी लोक नॉनव्हेज खातात आणि खाण करतात यावरून झालेला वाद आहे. जैन बिल्डरांनी नॉनव्हेज खाण्यामुळे मराठी माणसांना घरं द्यायची बंद करून टाकली आहेत. या मुंबईत, महाराष्ट्रात आणि देशात आम्ही काय खायचं हे कोण ठरवणार? याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान विरोधकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, “प्रत्येकाला काय खावं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटत असेल तर तो समाज निश्चितपण शाकाहारी लोकांचं संघटन, एखादी योजना तयार करू शकतो. पण साधारणपणे यांना आम्ही राहू देणार नाही, आम्ही त्यांना राहू देणार नाही, अशा प्रकारे घर नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय म्हणून त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाही. मात्र त्या आधारावर भेदभाव करणं आपल्याला मान्य करता येणार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर त्यावर योग्य कारवाई करण्या येईल”. हेही वाचा>> Kalyan Society Scuffle : मराठी माणसाला कल्याणमध्ये मारहाण, मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक; म्हणाले, “कधी-कधी काही नमूने…” “आपल्या देशात अनेक परंपरा आहेत. बंगालसारख्या राज्यामध्ये सगळे समाज मासळी खातात. देवालाही दाखवतात. काही राज्यांमध्ये १०० टक्के शाकाहार दिसतो. त्यामुळे आपल्या परंपरेनी निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांना देवत्वाची संज्ञा दिली आहे. आपल्या देशाचं वैविध्य टिकलं पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे”. “जशी आपली राष्ट्रीय अस्मिता आहे तशी आमची क्षेत्रीय अस्मिता देखील आहे. ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत. त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे. त्यावर जर कोणी घाला घालत असेल तर जेवढे तुम्ही व्यथित आहात तेवढे आम्ही व्यथित आहोत, त्यामुळे निश्चितपण त्यावर कडक कारवाई केली जाईल”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.