MARATHI

पश्चिम महाराष्ट्र बुडण्याची भीती? अलमट्टी धरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी

Amalpatti Dam On Maharashtra Border : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद पेटला असतानाच आता नवी समस्या निर्माण झाली आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणामुळे महाराष्ट्र बुडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने केली आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत अलमट्टी धरणाची या निर्णयाला विरोध करावा अशी मागणी केली आहे. उंची वाढवल्याने उत्तर कर्नाटकाती जमीन मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार आहे. मात्र, यामुळे पश्चिम महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा धोकाही वाढला आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला सांगलीच्या कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने विरोध दर्शवला आहे. सध्याच्या अलमट्टीच्या बॅक वॉटरमुळे सांगली,कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला फटका बसत आहे. जर पुन्हा कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणा उंची वाढवल्यास याची व्याप्ती आणखी वाढून थेट कराड पर्यंत आणि कोल्हापूरच्या शिरोळ बरोबर कर्नाटकच्या चिकोडी पर्यंत सगळे बुडण्याची भीती कृष्णा महापुर नियंत्रण समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. सध्या अलमट्टी धरणाची उंची 519.60 मीटर इतकी आहे. सध्याच्या उंचीमुळे सांगलीच्या पलूस पर्यंत बॅकवॉटर येत असल्याचं अंदाज आहे. कोल्हापूरच्या नरसोबावाडी पर्यंत फुग निर्माण होते. 2005,2019 आणि 2021 मध्ये अलमट्टीचा बॅकवॉटर सांगली-कोल्हापूरच्या महापुराला कारणीभूत असल्याचं समोर आलं होतं. आता अलमट्टी धरणाची उंची 5 मिटरने वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. 524.68 मीटर इतकी उंची करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली,सातारा कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याला अधिकचा फटका बसू शकतो. सांगलीच्या पलूस पर्यंतचा बँक वॉटर, साताराच्या कराड पर्यंत जाण्याची शक्यता. तर, कोल्हापूरच्या नरसोबावाडी पासून शिरोळ तालुक्यातील अनेक गाव महापुरात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला देखील अधिकचा फटका बसण्याची शक्यता आहे. क्कोडी पर्यंत अलमट्टीच्या धरणाच्या पाण्याचा बॅकवॉटर जाऊ शकतो अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.