यवतमाळ : जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात ७७ उमदेवारांनी नामांकन अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात १०२ उमेदवार आहेत. यवतमाळ, पुसद, आर्णी येथील महाविकास आघाडी आणि महायुतीतील बंडखोरांनी अर्ज मागे घेतले. मात्र वणी व उमरखेड येथे बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला अपयश आले. यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, आर्णी, राळेगाव व वणी या सात मतदारसंघात १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी यापैकी ७७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यवतमाळ मतदारसंघात १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता २२ उमदेवार रिंगणात आहेत. वणी मतदारसंघात चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. येथे आता १२ उमेदवार रिंगणात आहेत. राळेगावमध्ये सात जणांनी माघार घेतल्याने ११ जण निवडणूक लढवित आहेत. दिग्रसमध्ये चार जणांनी माघार घेतली. येथे १३ उमेदवार रिंगणात आहेत. आर्णीमध्ये सात उमदेवारांनी माघार घेतल्याने १४ उमेदवारांमध्ये लढत होईल. पुसदमध्ये १७ उमेदवारांनी माघार घेतली तर १३ उमेदवार रिंगणात आहेत. उमरखेडमध्ये २५ जणांनी माघार घेतल्याने १७ उमदेवार रिंगणात आहेत. सर्वाधिक २२ उमेदवार यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहे. सर्वांत कमी ११ उमेदवार राळेगावमधून लढत आहेत. हेही वाचा… अमरावती जिल्हयात अनेकांच्या तलवारी म्यान…पण, सात बंडखोर मात्र… s यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळला जावा या हेतूने उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरीया यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. मात्र यवतमाळात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुसदमध्ये नाईक कुटुंबात वाद निर्माण झाल्याने महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे उमेदवार इंद्रनील नाईक यांच्याविरोधात अपक्ष उमदेवारी दाखल करणारे त्यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांनी माघार घेतली. त्यामुळे नाईक कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आर्णी मतदारसंघात भाजपचे राजू तोडसाम यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. विष्णू उकंडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्यांनतर डॉ. उकंडे यांनी माघार घेतली. यामुळे यवतमाळात महाविकास आघाडीला तर पुसद व आर्णीमध्ये महायुतीच्या उमदेवाराला दिलासा मिळाला आहे. हेही वाचा… ‘भाजप’कडून फराळ वाटप नियमात, मात्र संविधान जागर नियमबाह्य.. हा कोणता कायदा? वणी व उमरखेड मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीला बंडखोरांची समजूत घालण्यात अपयश आले. वणी येथे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठकारे गटाचे संजय देरकर रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अनेकांनी समजूत घालूनही त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने वणीत महाविकास आघाडीतील दुफळी भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. उमरखेडमध्ये महाविकास आघाडीने काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार विजय खडसे यांनी अपक्ष उमदेवारी दाखल केली. खडसे यांनीही काँग्रेस नेत्यांना न जुमानता उमदेवारी कायम ठेवल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली. येथे भाजपचे माजी आमदार राजेंद्र नजरधने हे मनसेकडून निवडणूक लढवत असल्याने महायुतीचीही अडचण झाली आहे. None
Popular Tags:
Share This Post:
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…
December 24, 2024What’s New
खळबळजनक! लोणार येथे २५ लाखांचा अवैध औषधसाठा जप्त; कामोत्तेजक, गर्भपात…
- By Sarkai Info
- December 20, 2024
वाल्मिक कराड अधिवेशन काळात नागपुरातच, विरोधी पक्ष नेत्याच्या दाव्याने खळबळ
- By Sarkai Info
- December 20, 2024
Spotlight
विधानसभा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र, जयभीम घोषणा अन्…
- by Sarkai Info
- December 20, 2024
Today’s Hot
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
कारागृहातून सुटल्यावर काय? ३२३ बंदीवानांना ‘फास्ट फूड’चे प्रशिक्षण!
- By Sarkai Info
- December 20, 2024
‘मुंबई आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, सभागृहात काय घडले…
- By Sarkai Info
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”
NAGPUR
- by Sarkai Info
- December 20, 2024
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
NAGPUR
- by Sarkai Info
- December 20, 2024
शहांच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात, काँग्रेसचे विरोधात…
NAGPUR
- by Sarkai Info
- December 20, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.
Popular News
Top Picks
१८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात, काय आहे कारण?
- December 20, 2024
“…तेव्हा गृहमंत्री फडणवीस काय करत होते?”, नाना पटोलेंचा सवाल, म्हणाले…
- December 20, 2024
हे सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही… नाना पटोले म्हणाले…
- December 19, 2024