NAGPUR

नरेंद्र मोदी आम्हाला वेळ देणार नाही, असे का म्हणाले रोहित पवार ?

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू, परंतु ते भेटणार नसल्याचे वक्तव्य केले. विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते. रोहित पवार पुढे म्हणाले, राज्यातील सत्तेवर अजित पवार आहेत. उपमुख्यमंत्रीपद पक्षाचे नसून सर्वांचे आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पक्षाचे आमदार त्यांना भेटत आहे. मीही त्यांना भेटलो. राज्याच्या विकासाच्या प्रश्नावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू इच्छितो. परंतु ते भेटतील असे वाटत नाही. भाजप प्रत्येक गोष्टीत फक्त राजकारण करत असल्याने हे शक्य आहे. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाणीच्या विषयावरही त्यांनी संताप व्यक्त केला. हेही वाचा – हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर होणार का ? रोहित पवार पुढे म्हणाले, शुक्रवारी कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध आहे. “महाराष्ट्र संतांची भूमी आहे. परंतु भाजपच्या राजवटीत राज्यातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मराठींवर असे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाहीत. सध्या “महाराष्ट्राची अवस्था बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसारखी होत चालली आहे, जिथे प्रशासन अयशस्वी ठरले आहे आणि गुन्हेगारी वाढीस लागली आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत तर अशा घटनांचा सुकाळ होईल.” पवार यांनी भाजप सरकारवर मराठींच्या सन्मान आणि सुरक्षेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “हा फक्त एका कुटुंबावर झालेला हल्ला नाही, तर मराठींच्या अभिमानावर आघात आहे. सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश ठरल्याने असे विघातक आणि हिंसक कृत्य वाढीस लागली आहेत.” हेही वाचा – १८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात, काय आहे कारण? कल्याण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अनेक राजकीय नेत्यांनी भाजपच्या कारभारावर टीका तीव्र केली आहे. या घटनेमुळे राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सार्वजनिक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.