NAGPUR

विधानसभा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र, जयभीम घोषणा अन्…

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील वक्तव्य आणि त्यानंतर काँग्रेसच्या मुंबई कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला या मुद्यांवरून काँग्रेससह विरोधक विधानसभेत आज आक्रमक झाले. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी डॉ. आंबेडकरांविषयी काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याचा घोषणा दिल्या. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस शहा यांनी आंबेडकरांचा अपमान केला असल्याने त्यांनी माफी मागावी, यासाठी आग्रही आहे. तर भाजप लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी संसदेच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या खासदारांना धक्कामुक्की असल्याचा आरोप केला आहे. या मुद्यांवरून भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यलायाची तोडफोड केली आणि तेथील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिमांना काळे फासले. त्याचे पडसाड आज विधानसभेत उमटले. त्यासंदर्भात दिलेला स्थगन अध्यक्षांनी नाकारल्याने विरोधक आक्रमक झाले. आणखी वाचा- ‘भारत जोडोत’ सक्रिय शहरी नक्षल संघटनांची नावे द्या, मुख्यमंत्र्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पत्र सभागृहाचे कामकाज आज सकाळी ११ वाजता सुरू झाले. तेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षातील सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र घेऊन सभागृहात दाखल झाले आणि त्यांनी आंबेडकरांचे चित्र आसनासमोरील बाकावर ठेवला. काँग्रेसच्या कार्यालयावरील भ्याड हल्ला झाल्याचा मुद्दा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. भाजपला सत्तेचा माज आला आहे, त्यांची गुंडागर्दी सुरू आहे, असे आरोप त्यांनी केले. त्यामुळे सत्ताधारी बाकांवरील सदस्य देखील आक्रमक झाले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेस ढोंगी अशा घोषणा सत्ताधारी देत होते तर विरोधकांकडून जयभीमची घोषणा दिली जात होती. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज पुन्हा झाले तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी देखील डॉ. आंबेडकरांचे चित्र आणले होते आणि आसनासमोरील बाकावर लावले. आणखी वाचा- स्वत:ला आगीत झोकून सिलिंडर बाहेर काढणाऱ्या करिनाच्या धाडसाची दखल… अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही महापुरुषांचे किंवा देवी-देवतांचे चित्र सभागृहात आणाले जाऊ नये अशी परंपरा आहे याची आठवण करून दिली. नंतर दोन्ही बाजूंचे सदस्य ऐकण्याच्या मनस्थिती दिसत नाही असे सांगून पुढील कामकाज सुरू केला. विरोधकांच्या बाकावर आंबेडकरांचे चित्र पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बाबासाहेब यांच्यावर आमचाही अधिकार आहे. पुढील बाकांवर आंबेडकरांचे चित्र लावण्याची दिली तशी आम्हालाही परवानगी आम्हाला द्यावी. त्यावर अध्यक्षांनी आपण कोणालाही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर भाजप आमदार वेलमध्ये उतरले. ‘एकच साहेब बाबासाहेब’ म्हणून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा दिल्या. तर आंबेडकर, आंबेडकर म्हणून विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणा दिल्या. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.