NAGPUR

गडचिरोली : आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

लोकसत्ता टीम गडचिरोली : तब्बल ३२ वर्ष नक्षलवादी चळवळीत कार्यरत असलेल्या नरसिंग या जहाल नक्षलवाद्यासह दोघांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळीला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. एरिया कमिटी मेंबर रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग ( ५५, रा. गट्टानेली, ता. धानोरा) व दलम सदस्य रमेश शामू कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (२५ , रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) अशी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नावे असून दोघांवर एकूण आठ लाखांचे बक्षीस होते. मागील काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधात पोलीस दलाकडून आक्रमक धोरण रबविण्यात येत आहे. सोबतच प्रशासनाकडून आत्मसमर्पितांसाठी विविध योजना देखील सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पणाकडे कल वाढलेला आहे. आणखी वाचा- ‘भारत जोडोत’ सक्रिय शहरी नक्षल संघटनांची नावे द्या, मुख्यमंत्र्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पत्र दरम्यान, २० डिसेंबरला १९९२ पासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी नरसिंग आणि रमेश कुंजाम या दोघांनी गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. दोघांवरही खून, जाळपोळ, चकमक प्रकरणी डझनभर गुन्हे दाखल आहेत. यातील रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग हा १९९२ पासून नक्षलवादी चळवळीत आहे. १९९२ मध्ये तो टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला.१९९५ मध्ये काकुर दलममध्ये राहुन सन १९९६ पर्यंत नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम तो करीत होता. पुन्हा तो टिपागड दलमसाठी काम करु लागला. पुढे माड एरिया (छत्तीसगड) येथे बदली होऊन २००१ पर्यंत त्याने पुरवठा टीममध्ये काम केले. २०१० पासून तो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १२ गुन्हे नोंद असून ६ चकमक, ५ खून, १ दरोडा प्रकरणात त्याचा सहभाग राहिलेला आहे. रमेश शामू कुंजाम हा २०१९ पासून माओवादी चळवळीत आहे. चेतना नाट्यमंच ,कुतुल दलममध्ये सदस्य म्हणून तो काम करत होता. त्याच्या गुन्हेकृत्याची पडताळणी सुरु आहे. आणखी वाचा- विधानसभा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र, जयभीम घोषणा अन्… नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा , पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ ३७ बटालीयनचे प्रभारी समादेशक सुजीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झाले. चालू वर्षात आतापर्यंत २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. २०२२ पासून आतापर्यंत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या ३३ झाली आहे. माओवाद्यांनी गुन्हे चळवळ सोडून आत्मसमर्पण करुन लोकशाही मार्ग स्वीकारावा , असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.