NAGPUR

कारागृहातून सुटल्यावर काय? ३२३ बंदीवानांना ‘फास्ट फूड’चे प्रशिक्षण!

बुलढाणा‍: जाणते – अजाणतेपणी हातून अपराध झाल्यावर न्यायालयातून शिक्षा दिली जाते व संबंधितांची कारागृहात रवानगी होते. मात्र कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का बसतो. यामुळे कारागृहातून सुटका झाल्यावर काय करायचे असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकतो. बुलढाणा जिल्हा कारागृहातील सुमारे सव्वातीनशे बंदीना भेडसावणाऱ्या या गंभीर प्रश्नाचे उत्तर म्हणून या कैद्यांना सध्या ‘फास्ट फूड’ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. १६ डिसेंबर २०२४ पासून बुलढाणा जिल्हा कारागृहातील ३२३ कैद्यांना टप्पा टप्प्याने हे सहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याशिवाय रोजगाराभिमूख व्यवसायाचे देखील प्रशिक्षण देण्यात येत आहे. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुरडे (कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे) व विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) जालिंदर सुपेकर, (कारागृह व सुधारसेवा) व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. आयोजनाकरिता कारागृह अधीक्षक संदीप भुतेकर, वरीष्ठ तुरंगाधिकारी मेघा बाहेकर यांनी पुढाकार घेतला आहे. हेही वाचा – महायुतीला सत्ता मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर किती कोटींचा खर्च झाला माहिती आहे का? कारागृहातून मुक्त झाल्यानंतर कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने येथील सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून १६ डिसेंबरपासून सहा दिवसांचे फास्ट फुड व्यवसायाचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कारागृहामध्ये ३२३ बंदी आहे. या बंद्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येत असून पहिल्या तुकडीमध्ये ३२ जणांनी यात सहभाग नोंदवला आहे. कोल्हापूर येथील प्रशिक्षका तृप्ती धिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरु झाले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी बंद्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याचा बंद्यांना भविष्यात उपजिवीकेसाठी निश्चितच फायदा होणार आहे. सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्फत कारागृहामध्ये बंद्यांकरीता शिबिरामध्ये नर्सिग कोर्स, टेलरींग कोर्स, मोटार रिवायडींग असे विविध प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्थाचे संचालक संदीप पोटे, ‘फॅकल्टी’ स्वनील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक प्रशांत उबरहांडे, मनिषा देव तसेच सर्व कारागृह अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. हेही वाचा – उपराजधानीत गुंडगिरीचा कळस, भीतीपोटी पेट्रोलपंप चालक महिलेचे गुंडांच्या पायावर लोटांगण… व्हिडीओ व्हायरल दरम्यान या प्रशिक्षणाला जिल्हा कारागृहातील ३२३ कैद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. बहुतांश कैदी स्वतःला झोकून देत प्रशिक्षण घेत असल्याचे कारागृह कर्मचाऱ्यांनी सांगितले. कैदेतून सुटका झाल्यावर करायचे का, जीवन कसे जगणार, आपल्या परिवाराचे पोट कसे भरणार असा बहुतांश कैद्यांचा प्रश्न आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आणि सहाय्यक ठरणार आहे. यातील अर्धेअधिक कैदी जरी ‘बाहेर पडल्यावर’ स्वयं रोजगार’कडे वळले, चांगल्या मार्गाला लागले तरी या उद्यमी प्रशिक्षण उपक्रमात उद्देश्य सार्थकी लागेल असा आशावाद आयोजकांनी बोलून दाखविला. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.