NAGPUR

हे सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही… नाना पटोले म्हणाले…

लोकसत्ता टीम नागपूर: राज्यातील महायुती सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही. सरकार अधिवेशनाची केवळ औपचारिकता करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. सरकार अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करत सरकार पळ काढत आहे. ‘आम्ही संसदीय कामकाज समितीकडे अधिवेशन दोन दिवसांसाठी वाढवण्याची मागणी केली. विदर्भ आणि मराठवड्यावर चर्चा व्हावी, असा प्रस्ताव दिला. मात्र, हे सरकार घाईगडबडीत पुरवणी मागण्यांवर थातुरमातुर चर्चा करून त्या मंजूर करून घेत आहे. २०२२ पर्यंत या राज्यावर २ लाख कोटींचे कर्ज होते. आता हा आकडा दहा लाख कोटींच्या घरात पोहचला आहे. आणखी वाचा- वर्धा : कोण म्हणतो मी नाराज! ‘हे’ आमदार म्हणतात, ‘मंत्री पदाची इच्छा…’ राज्यातील उद्याग दुसऱ्या राज्यात पळविले जात आहे. राज्याच्या तिजोरीचे दिवाळे निघत आहे आणि मुख्यमंत्री आता महाराष्ट्र थांबणार नाही, असे म्हणत आहे. यामुळे हे राज्य विकल्याशिवाय सरकार थांबणार नाही, असे वाटत आहे. हे सरकार बीड, परभणीच्या प्रकरणावर उत्तर द्यायला तयार नाही. एकीकडे संविधानावरून महाराष्ट्र पेटलेला असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आग ओतण्याचा प्रयत्न करताहेत. सरकारच्या या असंवेदनशीलतेचा आम्ही निषेध करतो.’, असेही नाना पटोले म्हणाले. आमचे नेते राहुल गांधी यांनी देशातील भय भीतीमुक्त भारत व्हावा यासाठी भारत जोडो यात्रा काढली होती. देशातील एकात्मतेसाठी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास त्यांनी केला. परंतु, मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेसोबत माओवादी संघटना जुळलेल्या असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी देशात सुरू केलेल्या एका चांगल्या उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी गालबोट लावण्याचे काम केले आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे नाना पटोले म्हणाले. आणखी वाचा- Devendra Fadnavis Video: महायुतीला ७६ लाख अतिरिक्त मतं कुठून मिळाली? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट; विधानसभेत दिलं उत्तर! राज्यात कुठल्याही समस्या नाहीत. दोन वर्षांत राज्य प्रगतीपथावर गेले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या भाषणात म्हणाले. पण, प्रत्यक्षात परिस्थिती या उलट आहे. मिळालेल्या बहुमताच्या आधारावर मुख्यमंत्री राज्यातील जनतेला मुंगेरीलाल के हसीन सपने दाखवित आहे, अशी टीका शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. विधानसभा निवडणुकीतील भाजपा युतीच्या विजयावर जनतेचा विश्वास बसलेला नाही. हे सरकार आपल्या मतांचे नसून निवडणुकीत काहीतरी घोटाळा झाला असल्याची जनतेची भावना आहे. ७६ लाख मते कशी वाढली याचे निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिले नाही पण राज्याचे मुख्यमंत्री मात्र मतदानप्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारकडवाडीच्या लोकांची वकिली करावी व बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद राहिली आहे, मतदारांची नावे वगळणे, नवीन नावांचा समावेश करणे यातील गैरकारभार व मतांची टक्केवारी यावर शंका उपस्थित केली जात आहे. रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते कशी वाढली, याची विचारणा काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे पण अद्याप आयोगाने त्यावर उत्तर दिले नाही. मारकवाडीच्या जनतेने याविरोधात आवाज उठवला पण सरकारने पोलीसांच्या मदतीने त्यांना मॉक पोलिंग घेऊ दिले नाही. आता अनेक ग्रामसभा बॅलेटपेपरवरच निवडणुका घ्या असे ठराव करत आहेत. जनतेच्या या भावनांचा आदर केला पाहिजे तो होताना दिसत नाही. ज्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे अपेक्षित आहे ती मुख्यमंत्री का देत आहेत, असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे. आणखी वाचा- अकोला : मध्य रेल्वेचे ७६.४३ कि.मी.चे स्वयंचलित ‘सिग्नलिंग’, फायदे काय जाणून घ्या… ईव्हीएम, निवडणूक आयोग, भाजप यांच्याविरुद्ध बोलणे म्हणजे देशद्रोह आहे का, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,‘बीड, परभणीतील वातावरण तापलेले आहे. अशात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला करण्यात आला. अशात राज्याचा गृहमंत्री कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल्याच्या अभिभाषणावर दिलेले उत्तर म्हणजे ‘कसं काय चाललंय, छान छान चाललंय’ अशा स्वरूपाचे आहे. प्रत्यक्षात राज्यातील परिस्थिती या उलट आहे.’ None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.