NAGPUR

नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…

नागपूर : अजनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी दिव्या (बदललेले नाव) सातव्या वर्गात शिकते. तर आरोपी श्रावण हा मूळचा गोंदियाचा असून कामाच्या शोधात नागपुरात आला होता. दीड वर्षापासून तो अजनीतील एका डेकोरेशन कंपनीत कामाला लागला. त्याच्या वस्तीत राहणारी दिव्या ही शाळेत जात असताना तो तिचा पाठलाग करीत होता. शाळेपर्यंत तो जात होता. तिच्या घरासमोर तासनतास बसत होता. तिच्या घरी कुणी नसताना तो तिला भेटायला घरी गेला. तू मला खूप आवडतेस… मी तुझ्या प्रेमात पडलो… तू जर साथ देशील तर आपण दोघे प्रेमविवाह करु…असे बोलून जाळ्यात ओढले. लग्न करणार असल्यामुळे दिव्यासुद्धा फसली. हेही वाचा… मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत u दोघांच्याही भेटी-गाठी वाढल्या. घरी कुणी नसताना दोघेही एकमेकांना भेटायला लागले. महिन्याचे वेतन मिळाले की श्रावण तिला चित्रपट, हॉटेल आणि फिरायला घेऊन जायला लागला. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. आई-वडिल गाढ झोपल्यानंतर मुलगी मध्यरात्री एक वाजता प्रियकराच्या दुचाकीवरुन घरातून बाहेर पडली. ती सकाळी पाच वाजता घरी परतली आणि तेवढ्यात वडिलांना जाग आली. मुलीला युवकाच्या मिठीत बघताच वडिल संतप्त झाले. वडिलांनी दम देताच तिने प्रियकराने बळजबरी शारीरिक संबंध केल्याची कबुली दिली. या प्रकरणी तक्रारीवरुन अजनी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. श्रावण राऊत (३०, अजनी) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. हेही वाचा… ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा श्रावण आणि दिव्याचे शनिवारी मध्यरात्रीला भेटण्याचे ठरले होते. एक वाजता कुटुंब झोपल्यानंतर हळूच चौकात आली. तेथे श्रावण दुचाकी घेऊन उभा होता. त्याने तिला फुटाळ्यावर फिरायला जाण्यासाठी विचारले. तिने नकार दिल्यामुळे डेकोरेशनच्या गोदामात नेले. तेथे दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पहाटे पाच वाजेपर्यंत थांबल्यानंतर दिव्याने घरी सोडून मागितले. हेही वाचा… राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील… श्रावणने पहाटे पाच वाजता दिव्याला घरासमोर सोडले. तिने जाताना प्रियकराला मिठी मारली आणि तेवढ्यात तिचे वडिल लघुशंकेसाठी घराबाहेर आले. मुलीला प्रियकराच्या मिठीत बघताच त्यांचा पारा चढला. दरम्यान, प्रियकर पळून गेला. मुलीला विचारणा केली असता तिने प्रियकर असल्याची कबुली दिली. तसेच प्रियकराने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही वडिलांना सांगितले. या प्रकरण अजनी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रियकराला अटक केली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.