NAGPUR

यवतमाळकर स्वरकन्येच्या सत्काराला अभिनेता सचिन येणार

यवतमाळ : आपल्या गायानाने महाराष्ट्राला वेड लावणारी यवतमाळ येथील गीत रंजना प्रशांत बागडे ही दूरचित्रवाणीच्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व ३’ महाअंतिम फेरीत पाहोचली आहे. गीतचे कौतुक करण्यासाठी अभिनेता सचिन पिळगावकर बुधवारी यवतमाळात येत आहेत. गीतच्या यशाबद्दल यवतमाळकरांच्या वतीने तिचा नागरी सत्कार बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. छोटे उस्ताद कार्यक्रमाचे परीक्षक, अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्याहस्ते गीतचा सत्कार करण्यात येणार आहे. इयत्ता नववीत असलेली यवतमाळची स्वरकन्या गीत हिने आपल्या विविधांगी गायगाने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी संगीत क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. अनेक वाहिन्यांवर तिने आपल्या गायनाने छाप पाडली. स्टार प्रवाह वाहिनीवरील छोटे उस्ताद कार्यक्रमात महाअंतिम फेरीत ती पोहचली आहे. त्यानिमित्त यवतमाळात तिचा नागरी सत्कार व लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. गीतच्या गायनाचे चाहते असलेले अभिनेते सचिन पिळगांवकर हे ६ नोव्हेबरला स्वत: गीतच्या घरी जावून तिचे अभिनंदन करणार असून त्यांनतर सायंकाळी ५ वाजता यवतमाळ शहरात काढण्यात येणाऱ्या स्वागत रॅलीत ते गीतसोबत सहभागी होणार आहेत. त्यांच्याच हस्ते गीतचा नागरी सत्कार कार्यक्रमस्थळी होणार आहे. त्यानंतर गीतच्या गाजलेल्या गीतांचा ‘स्वरदीपोत्सव’ हा लाईव्ह कार्यक्रम सादर होणार आहे. हेही वाचा… वर्धा : ‘माझी लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशीच’ या खासदारांच्या वक्तव्याने… u गीतने यापूर्वी झी टिव्हीवरील सारेगमप लिटील चॅम्प, सोनी टिव्हीवरील सुपरस्टार सिंगर आदी कार्यक्रमांत सहभागी होत पुरस्कार पटकाविले आहेत. स्टार वाहिनीवर आता ती अंतिम फेरीत पोहोचली असून, तीच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करत यवतमाळच्या चाहत्यांनी तिचा नागरी सत्कार आयोजित केला आहे. वयाच्या चवथ्या वर्षापासून गीत गाणे गात आहे. सुगम, शास्त्रीय, रॅप, कव्वाली, गझल असे सर्व प्रकार ती सहजपणे हाताळते. त्यामुळे तिच्या प्रत्येक गाण्यावर रसिक वन्समोअर ची दाद देतात, असा अनुभव तिचे वडील प्रा. प्रशांत बागडे यांनी सांगितला. पहाटे उठल्यानंतर दररोज एक तास रियाज आणि रात्री झोपण्यापूर्वी ती नियमित रियाज करते. गीतने शास्त्रीय संगीताचे धडे अमरावती येथील डॉ. परशुराम आणि डॉ. गीतांजली कांबळे यांच्याकडे घेतले. गीतने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी यवतमाळचे नाव आपल्या गायनाने सातासमुद्रापार नेल्याने तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.